Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / ड्रोनद्वारे जिवती तालुक्यातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

ड्रोनद्वारे जिवती तालुक्यातील ६८ गावांचे होणार सर्वेक्षण* *देवलागुडा ग्राम पंचायतीतून झाली मोजणीची सुरूवात*

ड्रोनद्वारे जिवती तालुक्यातील ६८ गावांचे होणार सर्वेक्षण*    *देवलागुडा ग्राम पंचायतीतून झाली मोजणीची सुरूवात*

*

 

(सय्यद शब्बीर जागीरदार )

 

जिवती :-  राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या २२ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार ग्रामविकस मंत्रालय, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (पुणे) व भारतीय सर्वेक्षण विभाग (डेहराडून) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व गावांच्या गावठाणमधील जमिनीचे जीआयएस आधारित ड्रोनद्वारे सर्वेेक्षण व भूमापन करण्याची योजना राबवली जात आहे. यात अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाचा उपयोग करून महाराष्ट्रातील सर्व गावांतील सर्व मिळकतधारकांचे मिळकतींचे मोजमाप व नकाशा तसेच आखिव पत्रिका तयार करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील ६८ गावातील गावठान जमिनीची मोजणी केली जाणार असुन या ड्रोन कॅमेऱ्याच्या मोजणीची सुरूवात देवलागुडा ग्राम पंचायत येथून केली आहे. पाच मिनिटाच्या या ड्रोन सर्वेक्षणात संपूर्ण गावाचे भुमापन केले आहे.

          स्वामीत्व योजनेअंतर्गत ड्रोन सर्वेक्षणाकरिता जिवती तालुक्यातील ६८ गावांची निवड झाली असून यासाठी पंचायत समिती स्तरावरून गावात चुना मार्किंग व तत्संबधी कामे तसेच स्वयंघोषणापञ, प्रमाणपञ ई, च्या कामाकरिता ग्रामसेवक व ग्रामपंचात कर्मचाऱ्यांना सुचना पञ देऊन संपूर्ण कामे करून घेतली आहे. भारतीय सर्वेक्षण विभागाचे ड्रोन तज्ञ अधिकारी मनिष ढोके, भुमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी प्रदिप बोरकर, राजेश जाधव, सोनम राठोड, ग्रामसेवक बाबाराव पोडे, व गावकऱ्यांच्या उपस्थितीत ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले आहे. जवळपास जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील ड्रोन सर्वेक्षणाचे काम पुर्ण होत आले आहे. शेवटच्या टप्प्यातील जिवती तालुक्यातील गावातील गावठान जमिन मोजणीचे काम हाती घेतले असून लवकरच तालुक्यातील ६८ गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून चिमुर तालुक्यातील गावांची ड्रोन द्वारे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे भारतीय सर्वेक्षण विभागाचे प्रमुख व ड्रोन तज्ञ्ज्ञ मनिष ढोके यांनी लोकशाही वार्ताशी बोलताना सांगितले.

 

◆ प्रतेक घराचा नकाशा होणार तयार

________________________

गावातील सर्व मालमत्तांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाआधारे सर्वेक्षण होऊन प्रत्येक घराचा नकाशा तयार होणार आहे. यामुळे आपल्या मिळकतीच्या सीमा व नेमके क्षेत्र समजण्यास मदत होईल. आपल्या मालमत्तेचे अधिकार अभिलेख पुरावा म्हणजेच मालमत्ता पत्रक मिळणार आहे. मालमत्ता पत्रक म्हणजेच गावठाणातील घर, जागेचा मालकी हक्काचा पुरावा असल्याने त्याआधारे कर्ज उपलब्ध होऊ शकते. तारण म्हणून मालमत्ताधारकाला जामीनदार राहता येईल. विविध आवास योजनेत मंजुरी सुकर होईल. तसेच मालकीसंबंधी तंटे, वाद मिटवण्यात कायदेशीर दस्तऐवज तयार होईल.

मालकी हक्कासंबंधी अभिलेख व नकाशा तयार झाल्याने आर्थिक पत उंचावण्यास मदत होईल. जागेची मालकी व हद्दीसंबंधी वाद किंवा तंटे मिटवण्यासाठी गावठाण भूमापन अभिलेख कायदेशीररीत्या प्रमाणित मानले जाईल, यामुळे वाद व तंटेही मिटतील. जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात होणारी फसवणूक टाळता येईल.

_______________________

◆ ड्रोन सर्वेक्षणातून घराचा नकाशा, सार्वजनिक जागा, रस्ते, नाले यांचे नकाशे व अभिलेख तयार होणार असल्याने सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण होणार आहे.

            - राजेश जाधव

भुमापन अधिकारी,उपविभागीय भुमिअभिलेख कार्यालय जिवती

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...