Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / राजर्षी शाहू महाराज...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

राजर्षी शाहू महाराज यांच्या 148व्या जयंती निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला ● छावा फाऊंडेशन चा अनोखा उपक्रम ● प्रमुख मार्गदर्शक व प्रबोधनकार डॉ. समीर कदम यांची उपस्थिती

राजर्षी शाहू महाराज यांच्या 148व्या जयंती निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला    ● छावा फाऊंडेशन चा अनोखा उपक्रम  ● प्रमुख मार्गदर्शक व प्रबोधनकार डॉ. समीर कदम यांची उपस्थिती

 

( सय्यद शब्बीर जागीरदार )

 

राजुरा, 29 जून : राजर्षी शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंती निमित्त छावा फाऊंडेशन तर्फे प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा काल दि.28/062022 ला पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे काल हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक व प्रबोधनकार डॉ. समीर कदम यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकत डॉ. कदम म्हणाले की, "स्वतःच्या मुलांना शाळेत न टाकणाऱ्या पालकांना 1 रुपया दंड आकारला". मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणाची सोय राजर्षी शाहू महाराज यांनी केली. बहुजन वर्गासाठी शिक्षणाची दारे खुली करणारा एकमेव छत्रपती भारतीय इतिहासात अजरामर होऊन गेला. सामाजिक, राजनीतिक, आर्थिक, गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी शिक्षण हे सक्तीचे केले. शिक्षणं देणारा लोकराजा असे नाव लौकीक राजर्षी शाहू महाराज यांची ख्याती होती, असे स्पष्ट मत डॉ. समीर कदम यांनी आपल्या प्रबोधनातून व्यक्त केले. त्यांनी सध्याची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावयाची काळजी यावरही मार्गदर्शन केले. ओबीसी आरक्षण आणि राजकीय परिस्थिती उपस्थितांना समजावून सांगितली.

 

यावेळी जवळपास इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण पन्नास विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना प्रत्येकी एक वृक्ष व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मंचावर आसनस्थ अतिथींना ही पुस्तक व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. वृक्ष लागवडीचा सामाजिक संदेश छावा फाऊंडेशन तर्फे देण्यात आला. छावा फाउंडेशन नेहेमी सामाजिक कार्यात अग्रेसर असते आणि नेहेमी चांगले उपक्रम राबविणार असा विश्वास डॉ. समीर कदम यांनी छावा फाउंडेशन राजुरा बद्दल व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी डॉ. समीर कदम, डॉ. संदीप बांबोळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत साखरे, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, महावितरण कनिष्ठ अभियंता अमित ठमके, छावा फाऊंडेशन अध्यक्ष आशिष करमरकर, सचिव आकाश वाटेकर, उपाध्यक्ष बबलू चौहान आदी मंचावर उपस्थित होते.

 

रणजीत उगे, प्रितम शंभरकर, राहुल अंबादे, सुरेंद्र फुसाटे, निखिल कावळे, उत्कर्ष गायकवाड आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी अथक परिश्रम घेतले. छावा चे सल्लागार अमोल राऊत यांनी प्रास्ताविक, प्रणित झाडे यांनी सुत्रसंचालन तर आभार प्रदर्शन आशिष करमरकर यांनी केले. सदर प्रबोधन कार्यक्रमाला उत्स्फूर्त शेकडोच्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...