वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): शेतकऱ्यांनी पेरलेले ओसवाल व विक्रांत कंपनीचे सोयाबीन उगवले नसून, कंपनीने आमची फसवणूक केली आहे. कृषी विभागाने त्वरित पंचनामे करावे व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तालुक्यातील पांढरकवडा, वढा गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.
वढा येथील सरपंच किशोर वरारकर यांनी चंद्रपुर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली.त्यानंतर आज रविवारी कृषी अधिकारी यांनी गावात येउन शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी केली,जवळपास 30 शेतकऱ्यांनी ही तक्रार कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
पेरणीयोग्य पाऊस आल्याने सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली. त्यानंतर पाऊस पडूनही सोयाबीन अंकुरले नाही, ओसवाल व विक्रांत कंपनीने आमची फसवणूक केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे,असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...