वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (विशेष प्रतिनिधि): घुग्घुस येथून जवळच असलेल्या नकोडा गावातील विज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने संतप्त नकोडा भाजपा पदाधिकाऱ्यांनी घुग्घुस येथील विज वितरण कार्यालयात धडक दिली. घुग्घुस येथील विज वितरण कार्यालया समोर प्रचंड नारेबाजी व घोषणाबाजी करण्यात आली व निवेदन देण्यात आले.
सध्या पावसाळा सुरु असल्याने वादळ वाऱ्यासह पाऊस पडत आहे त्यामुळे विज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. दिवसा रात्री बत्तीगुल होत असते विजेचे उपकरण बंद होत असल्याने रात्रीदरम्यान झोप येणे कठीण झाले आहे याचा नाहकत्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे नकोडा येथील संतप्त भाजपा पदाधिकाऱ्यांनी व गावकऱ्यांनी घुग्घुस येथील विज वितरण कार्यालयात धडक देत वारंवार खंडीत होणारा विज पुरवठा नियमित सुरु ठेवण्याची मागणी निवेदनातून केली आहे तसचे असाच गावाचा विज पुरवठा खंडीत होत राहिल्यास भाजपा व नकोडा गावकऱ्यातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी नकोडा सरपंच किरण बांदूरकर, भाजपा अध्यक्ष बाळकृष्ण झाडे, उपसरपंच मंगेश राजगडकर, भाजपाचे ऋषी कोवे, धानोरा उपसरपंच विजय आगरे, सोनेगाव सरपंच संजय उकीणकर, सुचिता बोबडे, रजत तुराणकर, कंपा राजय्या, राजू चांदेकर, पंढरी कोवे, महेंद्र मेश्राम, सारिका चोपने, ममता मोगरे, सविता भांदककर, संध्या उमरे, संगीता निखाडे, रंजिता तेलंग, सारिका डंभारे, आकाश काळे, प्रकाश काळे, अनिकेत गेडाम, महेश राजगडकर, जुनेद सय्यद, कबीर शेख, स्वप्नील हनुमंते व वैभव निखाडे उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...