आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती:- अतिदुर्गम आदिवासी नक्षल भागातील जिवती तालुक्यात पंतप्रधान ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीतून तालुक्यात निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्याच्या कामाकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याची खंत जनतेकडून व्यक्त केली जात आहे.पावसात सुध्दा डांबरीकरण केले जात असल्याचे बोलले जात असल्याची चर्चा सुरू आहे.
काही ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण दिवसा करण्यात येत आहे आणि काही ठिकाणी रात्रभर डांबरीकरण रस्त्याचे काम करण्याचा सपाटा संबंधित कंत्राटदार करत असल्याचे दिसून येत असल्यामुळे एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा जनतेतून कोणी संबंधित कंत्राटदाराला निकृष्ट डांबरीकरण रस्त्याच्या कामा बद्दल विचारले असता कंत्राटदार अरेरावीची भाषेचा वापर करत असून माझे संबंध अमुक मंत्री, खासदार, आमदारांशी आहे माझे कोणी काय करु शकत नाही कुठे तक्रार करायची करा अश्या प्रकारे मुजोरी करण्यात कंत्राटदार व कंपनीचे दिवानजी तबरेज असल्याचे बोलले जात आहे.
पावसाळ्यात जिवती तालुक्यातील नवनिर्माण डांबरीकरण रस्त्याचे डांबरीकरण उखडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण असे की दिनांक ८ जुन च्या पुरोगामी संदेश व पुरोगामी एकता या पोर्टल मध्ये, "गडचांदूर ते परमडोली मुख्य रस्त्याचे काम निकृष्ट"
"राजुरा बांधकाम उपविभागाचे डिप्टी इंजिनिअर बाजारे मालसुतो मध्ये मस्त, ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करण्यात व्यस्त" या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती आणि बातमी च्या पाचव्या दिवशीच निकृष्ट डांबरीकरण रस्ता फुटतो हे मात्र खरे, आंबेझरी ते पल्लेझरी या नवीन डांबरीकरण रस्ता चार ते पाच ठिकाणी फुटलेला असल्याचे शेख हकानी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना व पल्लेझरी येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी फुटलेल्या डांबरीकरण रस्त्याची चित्रीकरण करून एका वाॅटसाफ गृपवर टाकण्यात आले लगेच संबंधित काम करणाऱ्या कंपनीला जाग आली आणि जिसीपी मशिन ने फुटलेला डांबरीकरण रस्त्या उकरण्यात आला.
पत्रकार बातमीच्या माध्यमातून किंवा सामाजिक कार्यकर्ते तक्रारीच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाच्या कामाची पुर्वसुचना देऊन सुध्दा संबंधित बांधकाम विभागाला जाग येत नसणारतर "अंधे बहेरे मुक्के" असं म्हणायला हरकत नाही? "रस्त्याच्या बांधकामासाठी कोट्यवधी निधीचा चुराडा"
"रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार" असे म्हटले तर वावगे ठरणार नाही? अशी चर्चा तालुक्यातील जनता करत आहे
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...