रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात बल्लारपूर तालुक्यातील नागरिकांच्या विविध मागण्यांवर भाजपाच्या वतीने माजी पंचायत समिती सदस्य सोमेश्वर पद्मगिरवार यांच्या नेतृत्वात बल्लारपूर तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात कोठारी गावातील साईबाबा मंदिरात आरती करून करण्यात आली व हा मोर्चा आमडी, येनबोडी, कळमना, दहेली, बामणी गावातून चालत राहिला तसेच या गावांमधून मोठ्या प्रमाणात शेतकरी व सर्वसामान्य नागरिक जुळत गेले नंतर पत्ता गोदाम बल्लारपूर पासून पायदळ मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडकला या मोर्चाच्या पाच प्रमुख मागण्या होत्या.
1) ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली अशा शेतकऱ्यांना सरकारकडून 50 हजार रुपये देण्याचे कबूल केले त्याची पूर्तता व्हावी. 2) मागील दोन महिन्यांपासून अनेक लाभार्थ्यांना निराधार योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नाही त्यांना नियमित पैसे मिळावे. 3) पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु संबंधित अधिकाऱ्याच्या चुकीच्या सर्वे मुळे सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या लाभापासून लाभार्थी वंचित राहिले अश्या लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी व संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी. 4) मागील दोन वर्षापासून नवीन रेशन कार्ड धारकांना अनाज अजूनही मिळाले नाही त्यांना त्वरित लाभ मिळावा. 5) मागील वर्षी ज्या घरांची पडझड झालेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही त्यांना लाभ देण्यात यावा अशा विविध मागण्यांना घेऊन समस्त तालुक्यातील लाभार्थ्यांनी महाराष्ट्राच्या निष्क्रिय सरकारच्या विरोधात नारे देत आंदोलन केले व तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. आंदोलनाच्या सुरुवातीला सोमेश्वर पद्मगिरवार आणि आशिष देवतळे यांची भाषणे झाली ज्यामध्ये सरकारला चेतावणी दिली की जर जनतेच्या मागण्या त्वरित पूर्ण झाल्या नाही तर हे आंदोलन भविष्यात उग्र स्वरूप घेईल व जनतेच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड.हरीश गेडाम, शहराध्यक्ष काशी सिंग, गोविंदा पोडे, स्नेहल टिंबडिया,शोभाताई वडघने, सुनील फरकाडे, किशोर कोटरंगे, साईनाथ आदे, कवडुजी पुलगमवार, आबाजी गुरनुले, विजय वासमवर, गिरीश तोरे, रुपेश विरुटकर, गजु आदे, रुपेश चौधरी, प्रवीण जीवने, गिरीधर आत्राम, अशोक भोयर, रवी चनेकर,
बल्लारपूर शहरातून रणांजयसिंग, देवा वाटकर, मोहित डंगोरे, राजेश दासरवार, विकास दुपारे, राजकुमार श्रीवास्तव,अमन बंसल तसेच तालुक्यातील शेकडो लाभार्थी व भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थितीती होती.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...