आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी :- केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ ब्रम्हपुरीचे पत्रकार शिष्टमंडळांनी उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांचे मार्फत शेतमजुरांच्या मागण्या तसेच ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले.
यांत्रिकीकरण व तांत्रिक शेतीमुळे ग्रामीण भागातील शेतमजुरांचा रोजगार नगण्य झाला आहे. हाताला काम नाही , कामाला दाम नाही. अत्यल्प मजुरीमध्ये संसाराचा गाडा शेतमजुर वर्ग कसाबसा पुढे ढकलत आहेत . रोजगाराचा प्रश्न,निवाऱ्याचा प्रश्न,आरोग्याचा प्रश्न, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न व एकूणच जीवन जगणे हे कमालीचे त्रासदायक व अडचणीचे ठरत आहे.
अशा परिस्थितीत शेतमजुरांच्या ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासनाने त्वरित पावले उचलावी व त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य कराव्या अशी निवेदनाद्वारे विनंती केली असून, सर्व घरापासून वंचित नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत त्वरित घरे द्या.घरासाठी किमान पाच लाख रुपये अनुदान द्या. याकरीता विशेषतः ग्रामीण भागात कोणतेही बांधकाम करण्यास वाहतूक खर्च अतिरिक्त येतो त्यामुळे त्यांना जास्त खर्च येत असल्याने ग्रामीण भागात घरकूल योजने करीता शहरी भागा पेक्षा जास्त रक्कम देण्यात यावी.
सर्व गावरानधारक , अतिक्रमणधारकांना त्यांच्या नावावर जमिनीचे पट्टे त्वरित द्या. सरकारी जमिनीचे वाटप करा. भूमिहीनांना जमीन वाटपासाठी प्रकल्प प्रमाणे जमीन अधिग्रहित करा.
सर्वांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यात यावी. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट व सक्षम करा.
ग्रामीण भागातही दर्जेदार व मोफत शिक्षणाची सोय करा, शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा. दिल्लीतील सरकारी शाळे प्रमाणे महाराष्ट्रात सर्व समावेशक शाळा , शिक्षणाची व्यवस्था करा.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्वांना दोनशे दिवस रोजगार द्या व प्रति दिवस सहाशे रुपये किमान वेतन कायद्या नुसार वेतन द्या. शेतमजुरांसाठी स्वतंत्र केंद्रीय कायदा करा व बांधकाम कामगाराप्रमाणे कल्याणकारी मंडळाची स्थापना करून सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ द्या.घरकुल धारकांना सरकारी जागा किमान पंधराशे स्केअर फुट द्या व त्यांचे अतिक्रमण नियमानुकूल करा.घरकुल धारकांच्या जागांचा मालकीहक्क व अतिक्रमणे त्वरित नियमानुकूल करा व त्यांना घरकुलाचा लाभ द्या.अत्यंत गरजू व वंचित नागरिकांना घरकुलाचा त्वरित लाभ द्या.शेतमजूर महिलांना ५५ वर्षानंतर पुरुषांना ६० वर्षानंतर किमान दरमहा सहा हजार रुपये पेन्शन द्या व त्यांची जगण्याची हमी निर्माण करा अश्या अनेक मागण्या निवेदनातून केल्या आहेत ???????????,????????????? ????? ???????? ??????? ??????? ??? ???????????? ??????.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...