Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / प्रेस नोट सोमवारला...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

प्रेस नोट सोमवारला दि. १३/०६/२०२२ रोजी मा. ना. मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री, पालकमंत्र्यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून प्रतिकात्मक सत्कार म्हाडाच्या गटार योजनेच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करून पाठराखण करीत असल्याबाबत अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस नविन चंद्रपूर येथील मलनिस्सारण गटार योजनेच्या बांधकामातील भ्रष्टाचार विरोधात राजेश बेले यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन

प्रेस नोट सोमवारला दि. १३/०६/२०२२ रोजी मा. ना. मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री, पालकमंत्र्यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून प्रतिकात्मक सत्कार  म्हाडाच्या गटार योजनेच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करून पाठराखण करीत असल्याबाबत  अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस नविन चंद्रपूर येथील मलनिस्सारण गटार योजनेच्या बांधकामातील भ्रष्टाचार विरोधात राजेश बेले यांचे  जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन

चंद्रपूर - नविन चंद्रपूर परिसरातील ५३ कोटी २९ लाख २२ हजार रुपयांच्या मलनिस्सारण गटार वाहिनी व एसटीपी २४ एमएलडी व ८ एमएलडी या म्हाडा अंतर्गत कामात निकृष्ठ दर्जाची सामग्री वापरण्यात येत आहे. कंत्राटदाराच्या भ्रष्टाचारात सहभागी असल्याने म्हाडाचे अधिकारी निकृष्ट कामाची पाठराखण करीत आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले ६ जुनपासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सहा दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करून पाठराखण करणार्या मा.मुख्यमंत्री,मा. गृहनिर्माण मंत्री,मा.पालकमंत्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून प्रतिकात्मक सत्कार करण्यात येणार आहे.
 अन्नत्याग आंदोलनाला यंग चांदा ब्रिगेड चंद्रपूर महानगराध्यक्ष, आम आदमी पार्टी महिला शहर अध्यक्ष ् बल्लारपूर आम आदमी पार्टी शहराध्यक्ष, मानवाधिकार संरक्षण संघटना, जय विदर्भ व विदर्भ राज्य आंदोलन समितीने पाठिंबा दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ गुरूवारला मुंडण आंदोलन करण्यात आले. तरी देखील प्रशासनाने काहीच भुमिका घेतली नाही. केवळ म्हाडाकडून अहवाल मागितला आहे.अहवाल आल्या नंतर पाहू असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
म्हाडाच्या गटार योजनेच्या निकृष्ट कामाबाबत संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेद्वारे २२ मार्च २०२२ रोजी लेखी तक्रार करण्यात आली. लेखी तक्रारीच्या अनुषंगाने  म्हाडाचे कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांनी दि. २२/४/२०२२ रोजी मौका पाहणी केली व ९ मे २०२२ ला पाहणी अहवाल सादर केला. सदर पाहणी अहवाल दिशाभुल करणारा असून भ्रष्टाचार करणार्या कंत्राटदार कंपनी इगल इन्फ्रा इंडिया लि.ची पाठराखण करणारा असल्याचे दिसून येत आहे. यातून कंत्राटदारांची अधिकार्यासोबत साठगाठ असल्याचे स्पष्ट दिसून येते. कंत्राटदार कंपनी  इगल इन्फ्रा इंडिया लि.ने तयार केलेले मेनहोलचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले आहे. यातील २५९४ मेनहोल पैकी १८५० मेनहोलला निकृष्ट कार्यामुळे भेगा पडल्या आहे. तसेच जवळपास ६० ते ७५ किलोमिटर टाकण्यात आलेल्या पाईपलाईनच्या कामात शासनाच्या अटी शर्ती व नियमावलीचे सर्रास उल्लंघन केल्याचे निदर्शनास येत आहे.मलनिस्सारण वाहीनी एसटीपीच्या फिल्टर प्लांटच्या बांधकामात आरसीसी व गिट्टी,रेती,सिमेंटचा वापर योग्य प्रमाणात न केल्याने बांधकामाला मोठ्या प्रमाणात जागोजागी भेगा पडल्या आहे. या भेगा दिसू नये यासाठी कंत्राटदाराने त्यावर रंग मारुन भेगा लपविण्याचा प्रयत्न केला आहे. सदर कामात मोठ्या प्रमाणात भ्रस्टाचार होत असून यात शासकीय अधिकारीही सामील असल्याचे दिसून येत आहे. शासनाकडून कुठलीही कारवाई न करता भ्रस्टाचाराला मुकसंमती देण्यात येत असल्याने नाईलाजाने अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. मलनिस्सारण गटार वाहिनी व एसटीपी २४ एमएलडी व ८ एमएलडी कामात भ्रस्टाचारामध्ये साठगाठ करणार्या कार्यकारी अभियंत्यांची उच्चस्तरीय चौकशी करुन तात्काळ निलंबनाची कार्यवाही व फौजदारी गुन्हा दाखल करावा,मलनिस्सारण गटार पाईप लाईन एसटीपीच्या कामात निकृष्ट दर्जाची सामुग्री वापरल्याबद्दल ईगल इन्फ्रा इंडीया लि. कंपनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा,  संपूर्ण मलनिस्सारण गटार वाहिनी व एसटीपी बांधकामाची तिसर्या पक्ष थर्ड पार्टी कडून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आदी मागण्यासाठी ६ जुन पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत अन्नत्याग जनआंदोलन सुरु राहील असा इशारा बेले यांनी प्रशासनाला दिला आहे.

आपला विश्वासू

राजेश वा. बेले
संस्थापक अध्यक्ष
संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्था. चंद्रपूर
सदर वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिक, वृत्त वाहिनी, पोर्टल वर प्रकाशित करण्यात यावी हि विनंती.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...