आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी:- तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात रेती तस्करी केली जात आहे. मुख्यत्वे आवळगाव, चीचगाव या वैनगंगा नदी घाटावरून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी सूरू असून राजकिय क्षेत्रात उडी मारून राजकीय नेता म्हणून मोठा तोरा मिरविणारे अवैध वाळू व मुरूम माफियांसोबत अवैध मुरूम व वाळू तस्करी करु लागले आहेत .एका राष्ट्रीय पक्षाचा एक वयस्कर नेता बेलपातळी येथील मुरूम तस्करीतुन हिम्मत बळावल्याने एक नाही तर चार-चार ट्रॅक्टर वाहन लावून आवळगाव घाटावरून रात्रंदिवस अवैध वाळू तस्करी करीत असल्याची चर्चा आवळगाव परिसरात होतं आहे. तरीही स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी यांना सर्व प्रकार निदर्शनास येत नाही..? असा सवाल परिसरातील जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
तालुक्यात वाळू व मुरुम तस्करांचा बोलबाला वाढत चालला आहे. राजकीय नेत्याची दबंगगिरीच्या एंट्रीने भुरट्या वाळू तस्करांची सुद्धा कॉलर टाईट झाली असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या सर्व प्रकाराला जबाबदार कोण.? असा प्रश्न उपस्थित करून तालुक्यातील नागरिक प्रशासनाच्या कारभारावर संशय व्यक्त करू लागले आहेत.
तालुक्यातुन वैनगंगा नदी वाहते तर वैनगंगा नदी काठावर आवळगाव, चीचगाव व इतर गावे वसलेली आहेत आणि हि गावे जंगलव्याप्त असून जंगलात असलेल्या वन्यप्राणी या वाळू तस्करी व मुरूम तस्करी करणाऱ्या वाहनांच्या मोठ्या आवाजामुळे मुक्त संचार करु शकत नसल्याने वण्यजीव हे जंगल सोडून आपला मार्ग गावाकडे वळवून गावांमध्ये पाळीव प्राण्यांवर तर कधी मानवावर हल्ला करून नरडीचा घोट घेत ठार करीत आहेत. वनविभागाला सुद्धा याची जाणिव असून वनविभागाचे अधिकारी कर्मचारी बघ्याची भूमिका घेतं आहेत मात्र यात साधारण नागरिक भरडल्या जात आहेत.तर प्रसंगी मानवाला नाहक जीव गमवावा लागत आहे. जीव गमावल्यानंतर अवैध वाळू व मुरूम तस्करी करणारा राजकीय क्षेत्रात मोठा तोरा मिरविणारा नेता ज्याच्या निष्ककाळजीपणामुळे पाळीव प्राणी व मानवाला जीव गमावावा लागत आहे तोच समोर येवुन तुटपुंजे पैसे कुटुंबाला देवुन सामाजिक कार्यकर्ता असल्याच्या देखावा करीत आहे. "बोर देणे व आवळा घेणे" अशी भूमिका घेत आहे.असे चित्र डोळ्यासमोर दिसत असतांना सुद्धा प्रशासन गप्प का..? रेती तस्कर दादागिरी करून वैनगंगा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करीत आहेत. खुलेआम अवैध रेती व वाळू तस्करी केली जात असताना अवैध तस्करी करणारे वाहन इतक्या जोरात धावत असतो की जणू वाहनाला ब्रेकच नाही.
त्यामूळे सुद्धा अपघाता मध्ये वाढ होऊन कित्येक जणांना जीव गमावावा लागला असल्याने कित्येक कुटुंब उघड्यावर आले आहे.मात्र प्रशासकीय कारवाई शून्य.! प्रशासनावरून नागरिकाचा विश्वास उडत असल्याने नागरिकांचा वाली कोन...? असा सवाल तालुक्यातील जनतेकडून उपस्थित केला जात आहे.तालुक्यात रेती तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावली असताना संबधित यंत्रणेचे कायमस्वरूपी दुर्लक्ष दिसून येत आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...