Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / कर्तव्यदक्ष तलाठी श्री...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

कर्तव्यदक्ष तलाठी श्री पवार यांना कुर्झा साजात पुर्वव्रत करण्याची मागणी.

कर्तव्यदक्ष तलाठी श्री पवार यांना कुर्झा साजात पुर्वव्रत करण्याची  मागणी.

कुर्झा प्रभागातील नगरसेवक, पत्रकारांचे शिष्टमंडळ तसेच असंख्य गावकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन.

ब्रम्हपुरी :- माजी सैनिक असलेले व आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे तालुक्यातील महसूल विभागात नावलौकिक मिळविलेले कुर्झा साजातील पूर्णवेळ तलाठी श्री अमरसिंग पवार यांची कुर्झा साजातुन अवघ्या चार ते पाच महिन्यातील त्यांच्या चमकदार कामगिरी नंतर सुद्धा तालुका महसूल प्रशासनाने तडकातडकी बदली करून कुर्झा साजा क्षेत्राला प्रभारी तलाठी दिल्याने श्री पवार यांची कुर्झा साजात पूर्ववत, पूर्णवेळ तलाठी म्हणून नियुक्ती करण्याच्या मागणी साठी कुर्झा प्रभागातील नगरसेवक, कुर्झा साजातील असंख्य गावकऱ्यांनी तहसीलदार ब्रम्हपुरी यांना तर तसेच पत्रकारांचे शिष्टमंडळांनी  उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

कुर्झा साजामध्ये नगरपरिषद ब्रम्हपुरीचा कुर्झा प्रभाग, ग्रामपंचायत नवेगाव, ग्रामपंचायत कोथूळना असा मोठ्या लोकसंख्येचा क्षेत्र येतो तसेच गौण खनिज वाहतुकीचा हा साजा केंद्रस्थान असल्याने याठिकाणी जबाबदार व पूर्णवेळ तलाठी असावा अशी महसूल प्रशासनाची जवाबदारी असायला पाहिजे. मात्र तालुका महसूल प्रशासनाने या साजात प्रभारी तलाठी नियुक्त करीत पूर्णवेळ असलेले तलाठी श्री पवार यांची केलेली बदली आश्चर्यकारक असून कुर्झा साजाक्षेत्रात कार्यरत असतांना तलाठी श्री पवार यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेने अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा आणणे,सामान्य नागरिकांना वेळेत मदत करणे व महत्वाचे म्हणजे आपल्या साजात नेहमीच उपस्थित असणे यामुळे शेतकरी, नागरिकांना श्री पवार आपलेसे करून घेतं मदत करीत आपल्या कर्तव्याचा इमाने इतबारे पालन करीत असत. कर्तव्यदक्षता व विधायक कार्यामुळे तलाठी पवार आपल्या साजात पूर्वव्रत रुजू व्हावेत असे साजातील नागरिकांना वाटणे साहजिकचं आहे.

आपल्या कर्तव्यदक्षतेची ओळख देतं श्री पवार यांनी अवैध वाळू तस्करांवर वेळोवेळी आळा घालत विना परवाना वाळूची वाहतूक करीत असलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयामध्ये कुठल्याही दबावात न येता जमा केलेत याबाबत विविध वृत्तपत्रात बातम्या सुद्धा प्रसारित झाल्यात. मात्र अवैध वाळू तस्करी मध्ये गुंतलेले तस्कर, तस्करी मधील सेटिंग मास्टर, तस्करांसह संबंधित काही राजकीय व्यक्ती तसेच महसूल विभागातील काही लोकांच्या डोळ्यांमध्ये तलाठी श्री पवार खुपायला लागले व त्यांच्या आर्थिक हित संबंधात अडथळा निर्माण झाल्याने रस्त्याचा काटा असल्याचे त्यांना वाटू लागले. त्यामुळे तलाठी यांचेवर कुरघोडी करत श्री पवार यांची कुर्झा साजातून उचलबांगडी करून तहसील कार्यालयामध्ये बाबूगिरी करण्याकरिता तलाठी कार्यामधून पदमुक्त केले अशी सर्वत्र लोकचर्चा आजघडीला तालुक्यात चर्चिली जातं आहे.

नगरसेवक श्री सागर आमले, केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ न्यूजच्या पत्रकारांचे शिष्टमंडळ तसेच नगरपरिषद ब्रम्हपुरीतील कुर्झा प्रभाग, ग्रामपंचायत कोथुळना, ग्रामपंचायत नवेगाव येथील अंदाजे पाचशे सह्यानिशी साजातील नागरिकांच्या वतीने श्री अमरसिंग पवार यांना कुर्झा साजा क्र ०६ येथे पूर्णवेळ तलाठी म्हणून पूर्वव्रत नियुक्त करण्यात यावे या मागणीसाठी तहसीलदार मा. उषा चौधरी व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले असून निवेदनाच्या प्रतिलिपी मा. पालकमंत्री जिल्हा चंद्रपूर , विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवले आहेत.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...