Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / सेल्फ रिस्पेक्ट मुव्हीमेंट...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

सेल्फ रिस्पेक्ट मुव्हीमेंट च्या पुढाकाराणे 6 जून ला शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त व्याख्यानाचे आयोजन. प्रा अशोक राणा जेष्ठ विचारवंत व लेखक यांचे प्रियंदर्शिनी सभागृह चंद्रपूर येथे शिवराज्या वर व्याख्यान*

सेल्फ रिस्पेक्ट मुव्हीमेंट च्या पुढाकाराणे 6 जून ला शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त व्याख्यानाचे आयोजन. प्रा अशोक राणा जेष्ठ विचारवंत व लेखक यांचे प्रियंदर्शिनी सभागृह चंद्रपूर येथे शिवराज्या वर व्याख्यान*

*

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सेल्फ रिस्पेक्ट मुव्हीमेंट व शिवराज्याभिषेक दिन आयोजन समिती च्या वतीने येत्या 6 जून 2022 ला चंद्रपूर येथील प्रियंदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन सायंकाळी 6 वा करण्यात आले असून या प्रसंगी महाराष्ट्राचे जेष्ठ विचारवंत व प्रसिद्ध लेखक प्रा. डॉ. अशोक राणा हे शिवराज्याभिषेकाच्या औचीत्यावर व्याख्यान देणार आहे. प्रा राणा सर *भारतातील संतांची वैचारिक क्रांती व शिवराज्याचा उदय* यावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे.
वर्तमान काळात धर्माचे नावावर देशातील नागरिकांना आपसामध्ये लढवाण्या भिडविण्याचे सत्ताधारी पक्षाचे जे प्रयत्न सुरु आहे व भारतीय संविधानाच्या धर्मनिरापेक्षता आणि बंधुता या तत्वाला मातीमोल करण्याचा जो प्रयत्न सुरु आहे त्या कडे बघता दि 6 जून च्या व्याख्याना निमित्ताने चंद्रपूरकर जनतेला विचार ऐकण्याची संधी महापुरुषांच्या विचाराने कार्य करणाऱ्या सेल्फ रिस्पेक्ट मुव्हीमेंट ने उपलब्ध करून दिली आहे. व्याख्यानाचा लाभ चंद्रपूरकर जनतेने 6 जून ला घ्यावा असे आवाहन सेल्फ रिस्पेक्ट मुव्हीमेंट चे मुख्य संघटक बळीराज धोटे यांनी केले आहे.
*विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार* शिवराज्याभिषेक कार्यक्रमाचे औचीत्य साधून शिवराज्यभिषेक सोहळा आयोजन समितीच्या वतीने युपीएससी, न्यायालय, बांबू कला, पत्रकारिता, पर्यावरण आणि कोविड बिमारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, दोन वर्ष पर्यंत शासकीय रुग्णालयात कोविड तज्ज्ञ म्हणून सेवा देणारे डॉक्टर्स व नर्स चा सत्कार करण्यात येणार आहे.
यात नुकतीच जज ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकिशा पठाण व ललिता टाकभैरे, UPSC 2021 मध्ये उत्तीर्ण झालेले आदित्य जिवणे, अभिजित मानकर व अंशुमन यादव, बांबू कलेच्या उल्लेखनीय कार्यासाठी मीनाक्षी मुकेश वाळके, डोनेट ऍप तयार करून असंख्य लोकांना मदत उपलब्ध करून देणारे सारंग बोबडे, कोरोना योद्धा म्हणून उल्लेखनीय कार्य करणारे, सरकारी दवाखान्याचे डॉ बंडू रामटेके, डॉ. सचिन दगडी, डॉ.गणेश कौरासे, डॉ. सचिन बिलावणे, डॉ सौरभ राजूरकर, डॉ. आशिष पोडे, कोरपना चे येरमे डाम्पत्य, सिस्टर किरण वैरागडे, कोविड रुग्णासाठी आपली संस्था व मंगल कार्यालय उपलब्ध करून देणारे इन्स्पायर चंद्रपूर चे संचालक प्रा विजय बदखल व भद्रावतीचे रवींद्र शिंदे,पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवीणारे मा लिमेश जंगम,  पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्य करणारे प्रा डॉ योगेश दुधपचारे व प्रा सुरेश चोपने ई चा याप्रसंगी मनःचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तरी चंद्रपूरकर जनतेने कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी व प्रा अशोक राणा यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी हजारो च्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजन समिती व सेल्फ रिस्पेक्ट मुव्हीमेंट च्या वतीने करण्यात आले आहे.

 

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...