Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार अनंतात विलीन

डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार अनंतात विलीन

हजारो चाहत्यांनी दिला साश्रुनयनांनी निरोप ।। व्रतस्थ स्वयंसेवक काळाच्या पड़द्याआड़ : रविंद्र भागवत

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूरातील प्रसिध्‍द डॉक्‍टर  सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांना आज येथील शांतिधाम मोक्ष घाटावर मंत्राग्नि देवून अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार,सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ संदीप मुनगंटीवार यांनी मंत्राग्नि दिला. त्यावेळी अभूतपूर्व जनसागर लोटला होता.

डॉ सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे दिनांक ३ जुन  रोजी हृदय विकाराने नागपूर येथील किंग्ज वे रुग्णालयात  निधन झाले.त्यांच्या निधनाची वार्ता कळतात राज्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो नागरिकांकडून मुनगंटीवार परिवाराचे सांत्वन करण्यात आले. 


त्यांंच्या अंतिम दर्शनास राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते, कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिक आवर्जून उपस्थित होते. प्रामुख्याने चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विजय वडेटटीवार, खासदार सुरेश धानोरकर , माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर , माजी मंत्री शोभाताई फडणवीस , आ. चंद्रशेखर बावनकुले, आ. अशोक उइके,  आ. संजीव रेड्डी , आ. पंकज भोयर ,  आ. समीर कुणावार , माजी खासदार नरेश पुगलिया , खा अशोक नेते, खा. रामदास तडस, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु प्रशांत बोकारे ,आ. किशोर जोरगेवार , आ देवराव होळी ,  भाजपचे ज्येष्ठ चंदनसिंह चंदेल , माजी आमदार अतुल देशकर , संजय धोटे , प्रा अनिल सोले , डॉ उपेंद्र कोठेकर , अरविंद शहापूरकर , माजी नगराध्यक्ष राखी कंचर्लावार , डॉ सुरेश महाकुलकर , राहुल पुंगलिया , रामु तिवारी , विनोद दत्तात्रेय , दीपक जयस्वाल , राजीव कक्कड़ , देवराव भोंगळे , डॉ मंगेश गुलवाड़े , राजेंद्र गांधी,राहुल पावडे,हरीश शर्मा , अलका आत्राम , नंदू रणदिवे  आदी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्तिची उपस्थिति होती.

अंत्यसंस्कार झाल्यानंतर रा. स्व. संघाचे नगर संघचालक रविंद्र भागवत यांच्या उपस्थितीत शोकसभा पार पडली. डॉ. मुनगंटीवार यांच्या निधनाने व्रतस्थ स्वयंसेवक काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचे संघकार्य प्रत्येक स्वयंसेवकासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी होते असेही रविंद भागवत म्हणाले.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...