रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
नागपूर (चक्रधर मेश्राम) दि. 3 जून 2022:-
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पात परप्रांतीय मजुरांना प्राधान्य देत असल्याची ओरड होत असताना स्थानिक आमदाराने स्थानिकांना या लोहप्रकल्पात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाल्याचा कांगावा कितपत खरा आहे असा सवाल निर्माण झाला आहे. स्थानिक लोकांच्या हिताला प्राधान्य देण्याऐवजी लोहखनिजांचे उत्खनन करणाऱ्या कंपनीच्या हितासाठी आपली भूमिका मांडणाऱ्या लोकप्रतिनिधीची बांधिलकी कुणाप्रती आहे असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.या लोहखनिजाची वाहतूक करणारे ओव्हरलोड ट्रक भरधाव वेगाने धावत असतात.
यामुळे आलापल्ली ते आष्टी मार्गाची चाळण होण्यास सुरुवात झाली असून अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु सर्वसामान्यांच्या या समस्येवर आमदार महोदय एक ब्र सुद्धा काढत नाही याला काय म्हणायचे?
सिरोंचा महामार्गावर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे 60 जणांना आपला जीव गमवावा लागला. जर या लोकप्रतिनिधीला इतकी तळमळ असती तर शासनस्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न करून या महामार्गाची समस्या निकाली काढली असती.
परंतु नागरिकांच्या जीवाशी देणंघेणं असलेल्या प्रश्नावर मात्र लोकप्रतिनिधी फारसे गंभीर नसल्याचे यातून दिसून येते.
चामोर्शी तालुक्यातील आष्टी जवळ कोनसरी येथे लोह प्रकल्पाचे काम जोमाने सुरू आहे आणि हा लोह प्रकल्प मार्च 2023 पर्यंत कार्यान्वित होणार असून या प्रकल्पाचा जिल्ह्यातील दहा ते बारा हजार युवकांना रोजगार मिळणार असल्याची माहिती स्थानिक आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितली आहे. तसेच सध्या लोह प्रकल्पात रस्ता सुरक्षेकरीताच्या 500 लोकांसह 6500 पेक्षा अधिक बेरोजगारांना काम मिळाले असल्याचे म्हटले आहे.
परंतु सुरजागड खदानीच्या कंपनी चे उपाध्यक्ष अतुल खाडिलकर यांना विचारले असता त्यांनी आलापल्ली ते सुरजागड पर्यंत असलेल्या रस्त्याची सुरक्षा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कर्मी कंपनीकडून लावण्यात आलेले नाही, सुरजागड खदानीच्याच परिसरात कामात जवळपास फक्त 2 हजार कामगार लावण्यात आलेले असून,आहे आलापल्ली ते सुरजागड हा रस्ता शासनाने कंपनीला दिलेला नसल्याने, रस्ता सुरक्षेसाठी चारशे,पाचशे लोकं लावण्यात आले असल्याची माहिती पूर्णपणे खोटी असल्याची माहिती दिलेली आहे
यावरून स्थानिक आमदारांनी मुद्दाम पणे रस्त्याच्या सुरक्षेसाठी 400 ते 500 लोकांसह, साडे सहा हजार लोकांना कंपनीत कामाला लावण्यात आल्याची खोटी माहिती देऊन स्थानिक जनतेसोबत शुध्द फसवणूक करीत असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे सुरजागड लोह प्रकल्पातील रोजगाराच्या ‘जांगडबुत्त्या’ पासून जिल्ह्यातील बेरोजगार आणि स्थानिक आदिवासींनी सतर्क होण्याची वेळ आली आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...