Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / घुग्घुस शहरातील वेकोलीचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

घुग्घुस शहरातील वेकोलीचे दोन्ही सीएचपी बंकर लवकरच बंद होणार.

घुग्घुस शहरातील वेकोलीचे दोन्ही सीएचपी बंकर लवकरच बंद होणार.

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश.

दि. ०२ जून रोजी घुग्घुस येथील वेकोलीच्या अतिविशिष्ट विश्रामगृहात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांच्यात  घुग्घुस येथील सिएचपी बंकरमुळे निर्माण झालेल्या समस्येच्या सोडवणूकीसाठी बैठक पार पडली.

    घुग्घुस शहरातील बँक ऑफ इंडिया जवळील वेकोलीच्या आयआर बंकर तसेच कारगिल चौकातील एलएनटी बंकर अशा दोन कोळश्याच्या बंकरमुळे घुग्घुस वासीयांना  प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 
अगदी शहरात वस्तीच्या ठिकाणी हे बंकर असल्यामुळे कोळश्याच्या धूरामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. परिसरातील नागरिकांना दमा, अस्थमा, त्वचा रोग अश्या विविध आजारांना यामुळे तोंड द्यावा लागत आहे.

  आरोग्याच्या दृष्टीने हे सर्व प्रकार अतिशय गंभीर असून नागरिकांना यातून सुटका मिळावी या उद्देशाने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी हे दोन्ही बंकर तातडीने बंद करावे अशी मागणी अनेक दिवसा पासून वेकोलि प्रशासनाकडे रेटून धरली तसेच यासंदर्भात वेकोलि प्रशासना सोबत अनेक बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात आला होता.

 त्याअनुषंगाने आज महाप्रबंधक उदय कावळे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यात बैठक पार पडली. यादरम्यान सदर दोन्ही बंकर तातडीने बंद करण्यासंदर्भात वेकोलीने पाऊल उचलावीत अशी मागणी जिल्हाध्यक्ष भोंगळे यांनी केली. मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत वेकोलीकडून येत्या सप्टेंबर महिन्यात आयआर बंकर तर डिसेंबरपर्यंत एलएनटी बंकर बंद करण्यात येतील. असे आश्वासन महाप्रबंधक उदय कावळे यांनी दिले. 

यासोबतच घुग्घुस येथील कोळश्याच्या रेल्वे सायडींगचे स्थानांतरण मुंगोली येथे दीड ते दोन वर्षात केल्या जाईल असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
   आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत वेकोलीने आज घेतलेले निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहेत. आणि यामुळे आता घुग्घुस वासियांचा  कोळशाच्या धुरापासुन होणारा त्रास नक्किच कमी होईल अशी भावना जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी याठिकाणी व्यक्त केली.

या बैठकीला, माजी सरपंच संतोष नुने, अमला अधिकारी (खनन) सुजित कुमार पिशारोडी, क्षेत्रीय विक्रय प्रबंधक संजय विरमलवार, क्षेत्रीय कार्मिक अधिकारी बिनेज कुमार, उपक्षेत्रीय प्रबंधक ओम प्रकाश फुलारे यांच्यासह आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...