Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / नारंडा येथे १ कोटी निधीमधून...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

नारंडा येथे १ कोटी निधीमधून साकारणार पशुवैद्यकीय रुग्णालय

नारंडा येथे १ कोटी निधीमधून साकारणार पशुवैद्यकीय रुग्णालय

जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्या हस्ते भूमिपूजन ।। भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या अथक पाठपुराव्याला यश

 कोरपना तालुक्यातील मौजा नारंडा येथे पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्या हस्ते संपन्न झाले.सदर पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीकरीता १ कोटी रुपये निधी मंजूर झाला असून याकरीता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या अथक पाठपुरव्याला यश आले आहे.


          नारंडा येथे श्रेणी-२चे  पशुवैद्यकीय रुग्णालय असून सदर रुग्णालयाची इमारत अतिशय जीर्ण झाली होती,त्यामुळे गावातील पशुपालकांना भविष्यात धोका निर्माण होऊ शकला असता,तसेच रुग्णालयात काम करणारे डॉक्टर व इतर कर्मचारी यांना सुद्धा भीतीचे वातावरण होते,त्यामुळे सदर जागेवर नवीन इमारतीचे बांधकाम आवश्यक होते सदर बाबीची दखल घेत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्याकडे निवेदन देऊन वारंवार पाठपुरावा केला, सदर मागणीची दखल घेत सुनील उरकुडे यांनी नारंडा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीकरिता १ कोटी रुपये निधी मंजूर केला.

 

      यावेळी नारंडा येथे सदर पशुवैद्यकीय  रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले,यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,नारंडा ग्रामपंचायतच्या सरपंच अनुताई ताजने,उपसरपंच बाळा पावडे,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी कोंडलकर सर,माजी सरपंच वसंतराव ताजने, पोलीस पाटील नरेश परसुटकर,मुख्याध्यापक गुरूमुखी सर,माजी उपसरपंच अनिल शेंडे,ग्रामपंचायत सदस्य बापूराव सिडाम,अनिल मालेकर,नागोबा पाटील उरकुडे,मारोती शेंडे,भिकाजी घुगुल,सुभाष पाटील डवरे,विनोद तिखट उपस्थित होते.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...