Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / तीर्थरूप' लघु चित्रपटाचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

तीर्थरूप' लघु चित्रपटाचे उदघाटनिय कार्यक्रमाद्वारे ट्रेलरचे प्रकाशन

तीर्थरूप' लघु चित्रपटाचे उदघाटनिय कार्यक्रमाद्वारे ट्रेलरचे प्रकाशन

रौनक फिल्म इंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि आर्य स्टुडिओ निर्मित 'तीर्थरूप' या लघु चित्रपटाचं नुकतंच उदघाटन झालं असून १ जून ला या चित्रपटाचं ट्रेलर रिलीज करण्यात आलं. या चित्रपटाचे निर्माते आशिष निखाडे हे असून चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन मयुर पाचभाई यांनी केलं आहे. चित्रपटाचे उदघाटन लेखक,कवी तथा दिग्दर्शक आशिष नागदेवते सर, ब्रह्मपुरी (उदापूर), संदिप चौधरी सर महा सचिव युवा काँग्रेस कोरपना, लेखक तथा शिक्षक रोशनकुमार पिलेवान सर यांच्या हस्ते करण्यात आले. अत्यंत हालाकीची परिस्थिती असलेल्या शेतकरी कुटुंबातील मायेचं छत्र हरवल्या नंतर तळ हाताचा भोडा प्रमाणे जपणारा बाप, मुलाच्या शिकशणासाठी लाचार होणार बाप या चित्रपटात दाखविला आहे आशिष निखाडे यांनी चंद्रकांत मोहितकर यांचे विशेष आभार मानले. 


         आशिष निखाडे हा मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तहसिल मधिल कवठळा या छोट्याशा गावचा. शालेय जीवनापासूनच त्याला गायन, नक्कल, नाटके यांची अत्यंत आवड, त्यामुळे आशिष विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. पुढे तो वडसा झाडीपट्टी नाट्य क्षेत्राशी जुडला आणि आक्रित, रात्र पेटली काळोखाची, पाऊस पाणी, चकवा  या सारख्या अनेक नाटकांद्वारे आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर त्याने रुजवली. नंतर आशिष ने स्वतःची प्रेस सुरू केली आणि निर्माता म्हणून नावारूपास आला. पुढे त्याला जीवाला जीव लावणाऱ्या मित्रा सारखा भाऊ मिळाला. 

तो म्हणजे गडचांदूर येथे वास्तव्यास असलेला मयुर पाचभाई. मयुर हा सुद्धा झाडीपट्टी रंगभूमी, वडसा मध्ये काम करत असल्याचे समजल्यावर आशिष आणि मयुर यांची मैत्री बहरात गेली आणि येथूनच सुरू झाला दोघांचाही प्रवास. यांनी 'तू माझी आहेस' हा लघु चित्रपट काढला आणि चित्रपट श्रुष्टीत आगमन केले. हा चित्रपट प्रेक्षकांना इतका आवडला की आशिष आणि मयुर या दोघांनापण लोकांनी उचलुन घेतले. 

पहिल्या लघु चित्रपटाच्या यशानंतर 'तीर्थरूप' हा लघु चित्रपट येत्या १ जुलै ला प्रदर्शित होत असून नुकतेच ३१ मे ला चित्रपटाचा उदघाटनिय कार्यक्रमाद्वारे चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाला प्रा. लहुजी नवले सर, रेखा पाटील मॅडम, चंद्रकांत मोहीतकर, लता निंबेकर मॅडम नाट्य कलावंत चंद्रपूर, आशिष निखाडे, मयुर पाचबाई, आकाश भोज, कुमारी उत्कर्षा, हितेश शेडमाके सर, प्रविण बिल्लावार, विशाल कातकर, सुरज चापले उपस्थित होते.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...