रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांची पत्रकार परिषदेत मागणी
घुग्घुस येथून जवळच असलेल्या नकोडा येथील एसीसी सिमेंट कंपनीच्या ‘नॉट फॉर सेल’ सिमेंटच्या पिशव्या ह्या खाजगी घर बांधकामा करिता सर्रासपने विकल्या जात असल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. मात्र कंपनीचे अधिकारी यांची कंत्राटदार व संबंधित चोरट्यांशी आर्थिक संबंध असल्याशिवाय व साठगांठ असल्याखेरीज कंपनीच्या बाहेर सिमेंट विकल्या जाणे शक्य नाही.
त्यामुळे या सिमेंट चोरी प्रकरणात कंपनीचे ते कोण अधिकारी आहेत जे कंत्राटदार यांच्याशी संगनमत करून कंपनीचे ‘नॉट फॉर रिसेल’ सिमेंट खुल्या बाजारात विकतात याचा छडा पोलिसांनी लावला तर खरे चेहरे नक्कीच समोर येतील. त्यामुळे पोलिसांनी अगोदर एसीसी सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी त्यासोबत दोषी कंत्राटदार राजू रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करावी अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
मागील साडेतीन वर्षांपूर्वी घुग्घुस येथे एका घराच्या बांधकाम स्थळी ‘नॉट फॉर रिसेल’ सिमेंटच्या काही पिशव्या आढळल्या होत्या व त्या प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल होऊन एसीसी सिमेंट कंपनीचे कंत्राटदार राजू रेड्डी यांना याप्रकरणी अटक झाली होती. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती हे विशेष.
आता परत त्याच घटनेची पुनरावर्ती झाली असून कंपनीच्या अधिकाऱ्यांशी साठगांठ करून राजू रेड्डी यांनी एसीसी सिमेंट कंपनीच्या ‘नॉट फॉर रिसेल’ पिशव्या खुल्या बाजारात विकण्याचा सपाटा लावल्याने या प्रकरणी रामनगर पोलिसांनी कोसारा गावाजवळ असलेल्या घर बांधकामाच्या ठिकाणी काही ‘नॉट फॉर रिसेल’ सिमेंटच्या पिशव्या जप्त करून कंपनीच्या अधिकाऱ्याना पत्र दिले मात्र कंपनीचे अधिकारी यांनी या संदर्भात पोलिसांना मदत केली नाही असे कळते. दरम्यान त्या सिमेंटच्या पिशव्यावर ‘एस राज’ लिहिले असून ती कंत्राटी कंपनी राजू रेड्डी यांची आहे हे शिद्ध होत असल्याने राजू रेड्डी यांच्या विरोधात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत कां तकार दिली नाही यांचे आश्चर्य वाटत असल्याचे पत्रकार परिषदेत राजू कुकडे यांनी म्हटले आहे.
एसीसी सिमेंट कंपनीचे शिक्के असलेली नवीन कोरी खाली बैगा राजू रेड्डी कडे कशी ?
ज्याअर्थी एसीसी सिमेंट कंपनीचे ‘नॉट फॉर रिसेल’ सिमेंट कोसारा येथे मिळाले व ते पोलिसांनी जप्त केले त्यापैकी एका बैगावर ‘एस राज’ हे नाव स्पष्ट दिसत होते त्यावरून ह्या ‘नॉट फॉर सेल’ सिमेंटच्या पिशव्या ह्या राजू रेड्डी यांच्याच होत्या हे स्पष्ट झाले.
दरम्यान एकाच पिशवीवर ‘एस राज’ कसे ? हा प्रश्न उपस्थित करून राजू रेड्डी यांनी एसीसी सिमेंट कंपनीतून नवीन कोरी शिक्के मारलेली पिशवी स्वतःच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दाखवली ती आली कुठून ? का अशा नवीन कोऱ्या ‘नॉट फॉर रिसेल’ सिमेंटच्या पिशव्या कंपनी कंत्राटदार यांना मोफत देतात असा प्रश्न करून या प्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी राजू रेड्डी यांचे सूत जुळले असल्याने राजू रेड्डी ला वाचविण्यासाठी कंपनीचे अधिकारी प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा राजू कुकडे यांनी पत्रकार परिषदेत केला असून जर पोलिसांनी एसीसी सिमेंट कंपनीचे अधिकारी व कंत्राटदार राजू रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली नाही तर न्यायालयातून याप्रकरणी एसीसी सिमेंट कंपनीचे अधिकारी व कंत्राटदार राजू रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करू असा इशारा पण राजू कुकडे यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...