रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
गडचांदूर - दिनांक ३१ मे २०२२ ला महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री, राजेश टोपे यांच्या हस्ते राजुरा विधानसभा क्षेत्रातील नांदा, शेणगाव, विरूर स्टेशन व भंगाराम तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींचे लोकार्पण झाले असून याकरिता करण्यात आलेली पदभरती पारदर्शकपणे राबविण्यात आली नाही. त्यामुळे सर्व नियुक्त्या ह्या बाहेरच्या असल्याने त्या तात्काळ रद्द करून पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबवून स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी स्थानिक युवकांनी आरोग्य मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
स्थानिक उमेदवारांना आपल्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती झाल्यामुळे संधी मिळेल अशी आशा होती. मात्र नियुक्त झालेले कर्मचारी उद्घाटनाच्या दिवशीच उपस्थित दिसल्याने अनेकांची भंबेरी उडाली. ही पदभरती कधी झाली? याबाबत कोणालाही कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पदभरतीची स्थानिक पातळीवर जाहिरात सुद्धा करण्यात आली नाही. त्यामुळे स्थानिक पात्र युवक-युवतींमध्ये असंतोष आहे. नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये एकही स्थानिक उमेदवार नाही. याचा अर्थ राजुरा विधानसभा क्षेत्रात एकही पात्र उमेदवार नाही का? हा प्रश्न आहे. सीएससी संस्थेमार्फत ही भरती करण्यात आली आहे.
मात्र स्थानिक पातळीवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात न आल्याने पात्र उमेदवार अनभिज्ञ राहिले. त्यामुळे स्थानिक पात्र उमेदवार भरतीपासून वंचित राहिले. पदभरतीमध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. याला जबाबदार असलेल्या सीएससी संस्थेवर कारवाई करावी व पदभरती रद्द करुन नव्याने जास्त खप असलेल्या नामांकित वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करुन अर्ज आमंत्रित करावे व चारही तालुक्यांतील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी बिबी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आशिष देरकर, नांदा येथील माजी सरपंच घागरु कोटनाके, अभय मुनोत, पुरूषोत्तम निब्रड, शामकांत पिंपळकर, महेश राऊत, गणेश लोंढे, सतीश जमदाडे, कल्पतरू कन्नाके, मुन्ना मासिरकर यांच्यासह इतर युवकांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...