Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांचे कर्तृत्‍व अलौकीक – आ. सुधीर मुनगंटीवार

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांचे कर्तृत्‍व अलौकीक – आ. सुधीर मुनगंटीवार

भाजपा महानगर शाखेतर्फे पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांची जयंती साजरी !! रक्‍तदान शिबीराच्‍या माध्‍यमातुन अहिल्‍यादेवींना आदरांजली.

राजमाता अहिल्‍यादेवी होळकर यांनी स्‍त्रीयांची सेना बनवून नारीशक्‍तीचा परिचय जगाला करून दिला. अतिशय योग्‍य शासक व संघटक न्‍यायप्रियता, पराक्रमी योध्‍दा आणि सर्वश्रुत धर्नुधर या सर्व गोष्‍टींमध्‍ये पारंगत असणा-या तसेच इतिहासाच्‍या कालपठावर स्‍त्री व्‍यक्‍तीमत्‍वाचा ठसा उमटविणा-या राजमाता अहिल्‍या देवी यांचे क‍र्तृत्‍व अलौकीक आहे, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या जयंतीनिमीत्‍त भाजपा चंद्रपूर महानगर शाखेच्‍या वतीने रक्‍तदान शिबीराचे आयोजन डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सभागृह येथे करण्‍यात आले होते. या शिबीरात पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी मोठया संख्‍येने सहभाग घेतला. यावेळी चंद्रपूर भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहूल पावडे, सुभाष कासनगोट्टूवार, सचिन कोतपल्‍लीवार, विठ्ठल डुकरे, सौ. वनिता डुकरे, छबूताई वैरागडे, पुरूषोत्‍तम सहारे, सुर्या खजांची, राकेश बोमनवार, रामकुमार अक्‍कापेल्‍लीवार, आशिष ताजने, वर्षा सोमलकर, नूतन मेश्राम, सतीश तायडे, आकाश मस्‍के, अमित निरंजने, पवन ढवळे, प्रविण उरकुडे, मधू श्रीवास्‍तव, प्रसाद आकेपेलीवार, मनीष पिंपरे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

दिनांक ३१ मे २०२२ रोजी भाजपा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे पुण्‍यश्‍लोक राजमाता अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या जयंतीनिमीत्‍त त्‍यांना आदरांजली वाहण्‍यात आली. यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, माझ्या अर्थमंत्री पदाच्‍या काळात पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ अनेक गावांमधील धनगर वाडयांमध्‍ये प्रत्‍येकी ६५ लाख रूपये खर्चुन भवन बांधण्‍यात आले. त्‍यासाठी मी ४० कोटी रूपयांचा निधी उपलब्‍ध करून दिला. धनगर समाजाच्‍या विकासासाठी एक हजार कोटी रूपयांचा विशेष निधी सुध्‍दा या काळात मंजूर करण्‍यात आला. पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांनी त्‍यांच्‍या शासन काळात तिर्थक्षेत्र विकासावर विशेष भर दिला. हीच परंपरा पुढे नेण्‍याचा प्रयत्‍न मी माझ्या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात केला. श्री क्षेत्र भीमाशंकर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, शिखर शिंगणापूर, कोराडी चे जगदंबा देवस्‍थान, श्री क्षेत्र पंढरपूर अशा विविध तिर्थक्षेत्रांच्‍या विकासासाठी मी निधी उपलब्‍ध करून दिला. 

पंढरपुर येथे तुळशी वृदांवन, संकीर्तन सभागृह निर्माण करण्‍यात आले. यासर्वांमागील प्रेरणा ही पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर याच होत्‍या. समाजाचे हित साधण्‍यासाठी, उपेक्षित, वंचितांच्‍या आयुष्‍यात प्रकाशाचा सुर्य निर्माण करण्‍यासाठी, त्‍यांची सेवा करण्‍यासाठी त्‍यांनी आपले आयुष्‍य खर्ची घातले. राजगादीपेक्षा जनतेच्‍या हृदयातील सिंहासन त्‍यांच्‍यासाठी महत्‍वाचे होते. अशा या थोर स्‍त्री शक्‍तीला मी आदरांजली अर्पण करतो असेही आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...