आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
अलौकीक प्रतिभेचा धनी पंतप्रधान म्हणून लाभला हे आम्हां भारतवासियांचे भाग्य – आ. सुधीर मुनगंटीवार
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेली ८ वर्षे लोकहिताचे विविध निर्णय घेत देशाला प्रगतीपथावर नेले आहे. गोरगरीबांच्या कल्याणासाठी, महिला, युवक, दिव्यांग आदी सर्वच घटकांना न्याय देण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने विविध योजना यशस्वीपणे राबविल्या असून त्या माध्यमातुन सातत्याने लोकहित साधले आहे. ख-याअर्थाने सेवा, सुशासन व गरीब कल्याण पर्व भारतात मोदी सरकारच्या माध्यमातुन अवतरले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.
दिनांक ३० मे २०२२ रोजी चंद्रपूर जिल्हा भाजपा तसेच महानगर शाखेच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर येथे आयोजित सेवा, सुशासन व गरीब कल्याण पर्वाच्या शुभारंभ कार्यक्रमात ना. डॉ. भागवत कराड बोलत होते. यावेळी मंचावर विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सौ. वनिता कानडे, राजेंद्र गांधी, सौ. राखी कंचर्लावार, राहूल पावडे, सौ. अंजली घोटेकर, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, नामदेव डाहूले, रवि गुरनुले, विवेक बोढे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. भागवत कराड यांनी राज्य सरकारवर घणाघाती टिका केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्व आघाडयांवर अपयशी ठरले असून भ्रष्टाचाराने बरबटलेले हे सरकार आपल्या कर्मानेच कोसळणार असल्याची टिका डॉ. कराड यांनी केली. यावेळी बोलताना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विश्वगौरव नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने भारताला महासत्ता बनविण्याच्या दृष्टीने जी पाऊले उचचली आहे त्याला तोड नाही. त्यांची पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना शेतक-यांसाठी प्रचंड उपयुक्त ठरली आहे. पंतप्रधान मुद्रा योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जन-धन योजना, गरीब कल्याण अन्न योजना, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, उज्वला योजना, ई-कॉमर्स प्लॅटफार्म अशा विविध योजनांच्या माध्यमातुन भारतातील सर्व घटकांना न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी केला आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ या संकल्पाच्या पुर्तीसाठी त्यांनी घेतलेला पुढाकार न भुतो न भविष्यती असाच आहे. असा अलौकीक प्रतिभेचा धनी आम्हाला पंतप्रधान म्हणून लाभला हे आम्हा भारतवासियांचे भाग्य असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांवर दृष्टीक्षेप टाकत कलम ३७० रद्द करणे, आतंकवादाचा सामना करणे अशा विविध निर्णयांच्या माध्यमातुन भयमुक्त, भुकमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालक महानगर भाजपाचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले. कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...