संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
( सय्यद शब्बीर जागीरदार ) जिवती:- नांदा, शेणगाव, भंगाराम तळोधी व विरूर स्टेशन या चार ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थान निश्चिती १९९७ ला माजी आमदार वामनराव चटप यांच्या पुढाकारातून झाली. सन १९९१ च्या जनगणनेवर आधारित सन १९९७ मध्ये आरोग्य संस्था स्थापनेचा बृहत आराखडा निश्चित करण्यात आलेला होता. यामध्ये राज्यात एकूण २५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थाननिश्चिती करण्यात आली होती. यापैकी १२० प्राथमिक आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली. तथापि, १३२ प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थान निश्चित होऊन देखील शासन मंजुरी मिळत नव्हती. २०११ ला जनगणना झाल्यानंतर १९९७ पूर्वी स्थाननिश्चिती झालेल्या राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्याचे शासनाने ठरविले. १९९० ते १९९९ या काळात ॲड. वामनराव चटप हे राजुरा विधानसभेचे आमदार होते. या क्षेत्रात १९९१ च्या जनगणनेतील लोकसंख्या निकषानुसार ४ प्राथमिक आरोग्य केंद्र तयार व्हावे म्हणून त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर राज्य शासनाने आरोग्य संस्था स्थापन करण्याबाबतचा बृहत आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. या आराखड्यात राजुरा विधानसभा क्षेत्रातील नांदा, शेणगाव, भंगाराम तळोधी व विरूर स्टेशन या चार ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश ॲड. वामनराव चटप यांच्या पुढाकारातून झाला. त्यामुळे या चारही आरोग्य केंद्राचे खरे शिल्पकार हे ॲड. वामनराव चटप हेच ठरतात.
शासनाने राज्यभरात तयार केलेल्या या आरोग्य संस्था स्थापना आराखड्याचा शासन निर्णय २०१३ ला प्रसिद्ध झाला व त्यात याच्या आरोग्य केंद्राला मंजुरी देताना १९९७ पूर्वी या चारही आरोग्य केंद्राची स्थाननिश्चिती झाल्यामुळेच या ४ व राज्यातील काही इतर प्राथमिक आरोग्य केंद्राना मंजुरी देण्यात येत असा स्पष्ट उल्लेख आहे. २००९ ते २०१३ दरम्यान सुभाषभाऊ धोटे हे राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. त्यावेळी राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याने आमच्यामुळेच ४ ही आरोग्य केंद्र होत असल्याचा हास्यास्पद प्रचार काही काँग्रेसजन करत आहे. विशेष म्हणजे या आरोग्य केंद्रांना निधी हा तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजूर केला.
आरोग्य केंद्र इमारत तयार असून देखील २ वर्षापासून उद्घाटन झाले नाही. अखेर नांदा येथील शेतकरी संघटनेचे रत्नाकर चटप, शेणगाव येथील शब्बीर जागीरदार, विरुर स्टेशन येथील प्रभाकर ढवस व भंगाराम तळोधी जवळील व्यंकटेश मलेलवार आदींनी ॲड. वामनराव चटप यांचे नेतृत्वात आरोग्य केंद्राचे उद्घाटन न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शासनाला दिला. तसेच नांदा प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी रत्नाकर चटप यांनी बैठक देखील केली. १८ मेला राज्यमंत्री बच्चू कडू हे जिवती तालुका दौऱ्यावर असताना शब्बीर जागिरदार यांनी शेणगाव येथील आरोग्य केंद्राच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले . त्यावेळी उपस्थित माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील चार प्राथमिक आरोग्य केंद्र हे मंजूर असून त्याच्या इमारती देखील तयार आहेत असे राज्यमंत्र्यांना सांगितले. याबाबतचे व्हिडिओ फुटेज देखील उपलब्ध आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधून तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन करण्यास भाग पाडले.
एकंदरीत १९९७ ला चार आरोग्य केंद्रांचे स्थान निश्चिती करण्यास भाग पाडणे आणि त्यानंतर उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे तातडीने उद्घाटन व्हावे म्हणून प्रयत्नरत असलेले शेतकरी संघटनेचे शिलेदार व माजी आमदार ॲड. वामनराव चटप हेच त्या आरोग्य केंद्राचे खरे शिल्पकार आहेत: - ॲड. दीपक चटप
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...