Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / एसीसी कंपनीच्या नॉट...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

एसीसी कंपनीच्या नॉट फॉर रिसेल सिमेंट बैगा चोरणाऱ्या राजू रेड्डीवर गुन्हे दाखल करा.

एसीसी कंपनीच्या नॉट फॉर रिसेल  सिमेंट बैगा चोरणाऱ्या राजू रेड्डीवर गुन्हे दाखल करा.

कंपनीचे अधिकारी मुख्य व्यवस्थापक अनिल गुप्ता. मुख्य सुरक्षा अधिकारी जोगिंदर सिंह, पर्सनल मैनेजर पुष्कर चौधरी व सिव्हिल इंजिनिअर विवेक शर्मा यांच्यावर सुद्धा सिमेंट चोरीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी कंपनी व्यवस्थापन हादरले ?

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्य़ातील घुग्गुस नकोडा येथील एसीसी सिमेंट कंपनीच्या नॉट फॉर सेल सिमेंट च्या बैगा घुग्गुस येथील एका खाजगी घर बांधकामाकरिता वापरत असल्याची माहिती समोर आल्यानंतर  दिनांक 5/ 12/2018 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे  निवेदन देऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर घुग्गुस पोलीस स्टेशन येथे एसीसी सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून जप्त केलेल्या सिमेंट बैगा ह्याची शहानिशा करायलालावली दरम्यान  कापणीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन मधे तक्रार दिल्यानंतर  जवळपास तीन कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

 त्यात एस राज या कंत्राटी कंपनीचे कंत्राटदार राजू रेड्डी यांना या प्रकरणी अटक झाली होती आता परत त्याच राजू रेड्डी यांच्या "एस राज" चा शिक्का असलेल्या नॉट फॉर रिसेल सिमेंट बैगा कोसारा येथे सापडल्या व त्या रामनगर पोलीस स्टेशन मधे जप्त करण्यात आल्या आहे. या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे मात्र एसीसी कंपनीचे अधिकारी हे याबद्दल कुठलीही माहिती देत नसून त्यात सामील असलेल्या कंपनीचे अधिकारी व कंत्राटदार राजू रेड्डी यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्वरीत एस राज चे संचालक राजू रेड्डी यांच्यासह या सिमेंट बैगा चोरी प्रकरणात सामील कंपनीचे अधिकारी मुख्य व्यवस्थापक अनिल गुप्ता. मुख्य सुरक्षा अधिकारी जोगिंदर सिंह, पर्सनल मैनेजर पुष्कर चौधरी व सिव्हिल इंजिनिअर विवेक शर्मा  यांच्यावर सुद्धा सिमेंट चोरीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.


मागील साडेतीन वर्षांपूर्वी 200 नॉट फॉर सेल सिमेंट च्या बैगा घुग्गुस पोलिसांनी जप्त केल्या होत्या त्यावेळी त्या 200/- रुपये  प्रती दराने कलीम नावाच्या एका खाजगी बांधकाम करणाऱ्या व्यक्तीने कंपनीचे कंत्राटदार राजू रेड्डी यांच्याकडून विकत घेतल्या होत्या त्यामुळे कंत्राटदार राजू रेड्डी यांच्यावर सिमेंट चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली होती शिवाय  खुल्या बाजारात सिमेंट विकल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने या प्रकरणाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सिआयडी चौकशी सुद्धा मनसे च्या मागणीमुळे करण्यात आली होती. त्या घतनेला आता साडेतीन वर्ष पूर्ण होत असताना आता परत त्या घटनेची पुनरावृत्ती झाली असून  रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोसारा या गावाशेजारी असलेल्या एका खाजगी प्लॉट वर अंदाजे जवळपास 20 ते 22 नॉट फॉर रिसेल च्या सिमेंट बैगा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सापडल्या आहेत व रामनगर पोलिसांनी त्या जप्त पण केल्या आहे. 

या संदर्भात मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी  दिनांक 19/5/2022 ला रामनगर पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांच्याशी पर्यावरण नेते राजेश बेले व इतर मनसे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन चर्चा केली व त्यांनी म्हटल्याप्रमाणे कुकडे यांनी रामनगर पोलीस स्टेशन मधे तक्रार सुद्धा केली. अजूनपर्यंत पोलिसांचा तपास सुरू आहेत पण ज्याअर्थी त्या नॉट फॉर रिसेल सिमेंट बैगा वर "एस राज" या कंत्राटी कंपनीचा शिक्का आहे व त्याचे प्रमुख राजू रेड्डी यांच्यावर अगोदरच सिमेंट चोरीचे गुन्हे दाखल आहे तर मग त्यांच्यावर गुन्हा कां दाखल करण्यात आला नाही ?

असा सवाल करून यामध्ये कंपनीच्या काही अधिकाऱ्यांचा सुद्धा या नॉट फॉर रिसेल च्या सिमेंट बैगा चोरीत हात असल्याने ते परस्पर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषी कंत्राटी कंपनीचे कंत्राटदार राजू रेड्डी यांच्यासह कंपनीच्या अधिकारी मुख्य व्यवस्थापक अनिल गुप्ता. मुख्य सुरक्षा अधिकारी जोगिंदर सिंह, पर्सनल मैनेजर पुष्कर चौधरी व सिव्हिल इंजिनिअर विवेक शर्मा यांच्यावर सुद्धा सिमेंट चोरीचे गुन्हे दाखल करावे व सार्वजनिक मालमत्तेचा सर्हासपने दुरुपयोग होत असल्याने यावर कायम प्रतिबंध लावण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अन्यथा सार्वजनीक हिताचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा सुद्धा मनसे तर्फे दिलेल्या तक्रारीत राजू कुकडे यांनी दिला आहे

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...