आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी :
_पुरोगामी विचारांचा वारसा जपत, युवकांच्या सर्वांगीण विकासा करीता कटिबद्ध असलेले, युवकांना यथोचित मार्गदर्शन करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटना ब्रम्हपुरीच्या तालुकाध्यक्ष पदी सुरज तलमले यांची तर शहराध्यक्ष पदी राजेश माटे यांची नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती ब्रम्हपुरी येथील स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात पार पडलेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेड चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर झाडे यांनी नियुक्ती पत्र देऊन केली._
_शेतमालाला हमीभाव व दारुमुक्त गाव, हा मूलमंत्र हाती घेत १०० टक्के समाजकारण व १०० टक्के राजकारण या तत्त्वावर संभाजी ब्रिगेड चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावात कार्यरत आहे. संभाजी ब्रिगेड चंद्रपूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर झाडे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ब्रम्हपुरी शहरात स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले._
_सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड चंद्रपूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर झाडे हे होते. मार्गदर्शक म्हणून मराठा सेवा संघाचे खेमराज तिवाडे, संभाजी ब्रिगेड नागभिड चे सुनिल पाथोडे उपस्थितीत होते बैठकीची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. तद्नंतर जिल्हा दौऱ्यावर असलेले संभाजी ब्रिगेड चंद्रपूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर झाडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संभाजी ब्रिगेड चा इतिहास, ध्येयधोरणे, आव्हाने,समोरील वाटचाल, अडचणी आदी. विषयावर यथोचित मार्गदर्शन केले. तसेच संभाजी ब्रिगेड ब्रम्हपुरीच्या तालुकाध्यक्ष पदी सुरज तलमले यांची तर शहराध्यक्ष पदी राजेश माटे यांना नियुक्ती पत्र देत निवड केली._
_यावेळी संभाजी ब्रिगेड ग्राम शाखा कोलारी, पारडगाव, चौगानसह अन्य गावातील ग्राम शाखेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते._
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...