रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर जिल्ह्यातील मागास आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यातील असलेल्या दोन नगर परिषद व तीन नगरपंचायती अस्तित्वात आहे या भागात घनकचरा व्यवस्थापन तसेच वैशिष्टपूर्ण निधी दलित वस्ती नगर रस्ते विकास निधीचे कोट्यवधीची कामे करण्यात आली अनेक कामे निकृष्ट व अंदाज पत्रकाप्रमाणे करण्यात आलेली नाही सहा महिने उलटून जाताच अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रेट रस्ते उकळून खड्डे पडले आहे तसेच अनेक कामे मंजूर कालावधीमध्ये करण्यात आलेली नाही काही कामांना प्रशासकीय मान्यता नुसार मंजूर कामे कंत्राटदारांनी केलेलीच नाही कोरपना येथील चार वार्डातील 55 लाखांची कामे गायब असून वार्ड नंबर एक व वार्ड नंबर दोन येथील बगीच्या ज्येष्ठ नागरिक विसावा ही कामे केली नसताना संपूर्ण निधी खर्च झाला कसा तसेच अंदाज पत्रकाप्रमाणे कामे झालेली नाही 17 18 18 19 वित्तीय वर्षा संपूर्ण जिल्ह्यात रेती बंद असताना रेती वापर न करता दगडी चुरी वापर करून निकृष्ट बांधकाम करण्यात आले तसेच शासनाने मंजूर केलेल्या मान्यतेनुसार कामे करण्यात आलेली नाही घनकचरा कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी मजुरांचे शोषण भविष्य निर्वाह निधीचा गैरव्यवहार तसेच मजुरांना अल्प मजुरी देऊन शोषण केल्याच्या तक्रारी प्रलंबित आहे गडचांदूर येथील मुख्याधिकारी विधानसभा क्षेत्रातील अनेक नगरपंचायती व नगरपंचायती मध्ये प्रभारी मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडीत आहे मात्र नागरिकांच्या कामा ऐवजी कंत्राटदाराचे बिल काढणे यामध्ये अत्यंत व्यस्त आहे जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लागत नाही अनेक वेळा नागरिकांना कार्यालयात खेटे घालावे लागतात अनेक समस्या ने नागरिक त्रस्त आहे अनेक वेळा मुख्य अधिकारी कार्यालयात गैरहजर राहून मिटिंग व दौऱ्याला आहे असे कारणे दिल्या जाते या अरे रवी मुळे अनेक नागरिकांनी आंदोलनाचे शस्त्र उघडून आंदोलनाला सुरुवात केली आहे कोरपना नगरपंचायत मध्ये विशेष सभा घेऊन दारू दुकानाची ना हरकत देण्यामध्ये विलंब लागला नाही मात्र माहिती अधिकार नियमाची पायमल्ली करीत गेल्या आठ महिन्यापासून अपील दाखल करून सुद्धा मुख्याधिकारी यांना सुनावणी घेण्याचा वेळ नाही तसेच चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा व गैरव्यवहाराच्या माहिती लपवण्याचा प्रयत्न करून नियमाचे उल्लंघन करीत आहे गोंडपिपरी कोरपणा जिवती गडचांदूर येथील सर्वाधिक कामे एकाच कंत्राटदाराला देण्यात आले आहे यामागे भ्रष्टाचाराची मूल्यवर्धन साखळी असून या सर्व ठिकाणी मुख्य अधिकारी डॉ विशाखा शेळके यांच्याकडे प्रभार आहे यांच्या कारकीर्दीमध्ये नियमबाह्य कामे भ्रष्टाचार गैरव्यवहार निकृष्ट कामे झाल्याच्या अनेक तक्रारी शासन व जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहे िल्हा प्रशासन चौकशी कडे कानाडोळा करीत गैरव्यवहार करणाऱ्या मुख्याधिकार्यांना अहवाल मागून सुद्धा गेल्या आठ महिन्यापासून पत्रव्यवहार व इमेल करून सुद्धा अहवाल दिला नाही असे असताना वरिष्ठ कार्यालय चौकशी समिती गठीत करून कारवाई का करत नाही असा सवाल चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मा ना प्राजक्त तनपुरे नगर विकास राज्यमंत्री त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली अरुण निमजे महेंद्र चंदेल शरद जोगी प्रवीण काकडे मुकेश चव्हाण प्रश्न उपस्थित करून यांच्या प्रभार कार्यकाळात झालेल्या कामाची तसेच देयकांची व नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीची संपूर्ण चौकशी करून टेंडर घोटाळा उघड करावा व मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करून उचलबांगडी करावी अन्यथा जन आक्रोश उफाळून भ्रष्टाचाराचा पर्दाफाश व आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा नगर प्रशासन अधिकारी यांची भेट घेऊन आपण चौकशी कधी करणार समिती केव्हा गठीत करणार चौकशीला विलंबाचे कारण काय असे प्रश्न उपस्थित करून आपल्या कार्यालयापुढे आंदोलन ठोकू असा इशारा दिला आहे यामुळे विधानसभा क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्ध राजकीय नेते व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसल्या चे चित्र दिसून येत आहे
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...