वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
रोडवर पाणी मारण्याच्या कारणावरून घुग्घुस येथील वेकोलीच्या कर्मचाऱ्याने शालीकरांम वार्डातील नागरिकाला मारहाण केली असून तेथिलच महिलेला डोझर खाली चिरडून जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यानंतर वार्डवासीयांनी घुग्घुस पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. प्रभाकर शंकर पाटील असे आरोपीचे नाव आहे.
घुग्गुस शहरातील शालीकरांम वार्ड हा रेल्वे सायडिंग ला लागून असल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ पडलेली असते.त्यामुळं या रस्त्यावर नियमित पाणी मारावे असे येथील नागरिक दिनेश वर्मा यांनी वेकोलीचे कर्मचारी प्रभाकर पाटील यांना सांगितले.मात्र आरोपी प्रभाकर पाटील याने दिनेश वर्मा या नागरिकाला शिवीगाळ करत मारहाण केली.तसेच त्यांची पत्नी भांडण सोडवायला गेली असता त्यांना सुद्धा धक्काबुक्की केली.तसेच डोझर खाली चिरडून जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर परिसरातील नागरिकांनी याची तक्रार घुग्घुस पोलिसात केली असून पोलिसांनी आरोपी प्रभाकर पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला असून पूढील तपास सुरू केला आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...