वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधी): सोमवार, २३ मे रोजी घुग्घुस येथील सहाय्यक अभियंता वीज वितरण यांच्या कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्यात गेल्या महिन्यापासून घुग्घुस शहरात सुरू असलेल्या विजेच्या लपंडावासंदर्भात तोडगा काढण्यासाठी बैठक पार पडली.
मागील सप्ताहात मुख्य अभियंता सुनील देशपांडे तसेच अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे यांना निवेदन देऊन येत्या पंधरा दिवसांत विजेचा लपंडाव थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी याआधी दिला होता. त्याअनुषंगाने आज ही बैठक घेण्यात आली.
बैठकी दरम्यान, घुग्घुस शहरातील वारंवार खंडित होणारा विजपुरवठा सुरळीत करणे, घुग्घुस शहरात विविध ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर लावणे, कार्यालयात रात्रपाळीस दोन कर्मचारी ठेवणे, बेलोरा पाणी टाकी जवळ विद्युत पुरवठा सुरू करणे, व्होल्टेज योग्य करणे, नवीन मिटर देणे, लॉयड्स कंपनी जवळील ६६ केव्हीचा सब स्टेशन कालबाहाय्य झाला असल्याने त्याठिकाणी नवीन ३३ केव्हीचा सबस्टेशन सुरु करणे, घुग्घुससह पांढरकवडा येथील विजेचा लपंडाव थांबविणे आणि वीज पुरवठा अखंडितपणे सुरू ठेवण्याबाबत सुयोग्य उपाययोजना करणे. अशा विविध विषयांवर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.
चर्चेदरम्यान आलेल्या सर्व विषयांच्या सोडवणूकीसाठी आपण तातडीने कार्यवाही करू तसेच आजपासून रात्रपाळीस दोन कर्मचारी ड्यूटीवर ठेवण्यात येतील व येत्या आठ दिवसांत वीजेचा पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी दिले.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सभापती सौ. नितूताई चौधरी, पांढरकवडा सरपंच सुरज तोतडे, विनोद चौधरी, साजन गोहने, सुरेन्द्र जोगी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता चंद्रपूर विभाग सुहास पडोळे, सहाय्यक अभियंता चंद्रपूर ग्रामीण उप विभाग सतीश डाखरे उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...