Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / भंगार चोरांचा पत्रकारावर...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

भंगार चोरांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला.

भंगार चोरांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला.

19 मे रोजी सायंकाळी 5:15 वाजता नकोडा जिओसी खदान येथे पत्रकार नौशाद शेख रा. घुग्घुस यांच्यावर भंगार चोरांनी जीवघेणा हल्ला केला. सायंकाळी 5:15 वाजता पत्रकार नौशाद शेख यांना नकोडा जिओसी खदान येथे काही भंगार चोर वेकोलीच्या खदानित बंद पडलेले मशीन गॅस कटरने कापून नेत आहे अशी बातमी मिळाली बातमी गोळा करण्यासाठी पत्रकार नौशाद शेख तिथे गेले व मोबाईलने विडिओ काढत असतांना आरोपी नौशाद कुरेशी व कौसर अली दोघेही रा. बँक ऑफ इंडिया मागे घुग्घुस तिथे आले व तू कशाला विडिओ काढत आहे असे म्हणून त्यांच्या मोबाईल फेकून दिला व शिवीगाळ करून हाताबुक्क्याने मारहाण केली व चाकूने जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यामुळे पत्रकार नौशाद शेख यांनी वेकोलीच्या वरिष्ठ अधिकारी यांना चोरीची माहिती दिली माहिती मिळताच वेकोलीचे सुरक्षा रक्षक त्याठिकाणी आले त्यांना पाहून आरोपी नौशाद कुरेशी व कौसर अली हे दुचाकीने तिथून पळून गेले. वेकोली सुरक्षा रक्षक व पत्रकार नौशाद शेख यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 323,504,506 गुन्हा दाखल केला. बातमी लिहेपर्यंत आरोपीना अटक करण्यात आली नाही. आरोपीना अटक करण्यात यावी अशी मागणी पत्रकार बांधव व नागरिक करीत आहे. पत्रकार सुरक्षित नाही आहे तर सामान्य नागरिक सुरक्षित कसे राहणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ?. आरोपी भंगार चोरावर अनेक गुन्हे दाखल आहे भंगार चोरी, कोळसा तस्करी भद्रावती, गडचांदूर, पडोली, शिरपूर, घुग्घुस वर्धा जिल्हा अश्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहे. यापूर्वी आरोपीनी शालिवाना कंपनीत डीपी फोडून कापर तांबा लाखो रुपयाचा चोरून नेला ओम टी कंपनी तडाळी येथे डीपी फोडून तांबा चोरून नेला नकोडा पाणी टाकीचे लोखंड चोरून नेले गुप्ता पॉवर प्लांट असे बंद पडलेले कंपनीत चोरी केली. पत्रकारावर हल्ला केल्याने याचा कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे अश्या भंगार चोरांना गावातून तडीपार करावे अशी मागणी केल्या जात आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...