आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
( सय्यद शब्बीर जागीरदार )
जिवती, ता. १८: माणिकगड पहाडावरील कोलामांच्या वेदनांवर केवळ फुंकर घालायसाठी मी आलेलो नाही. तर कोलामांच्या आयुष्यात सुवर्ण क्षण आला पाहिजे. त्यांना चांगले जीवन जगता आले पाहिजे. यासाठी आवश्यक ते नियोजन करायला मी आलो आहे आणि कोलामांचे शोषण करून त्यांचे रक्त पिणा-यांची मी गय करणार नाही. अशा शब्दात राज्याचे शालेय शिक्षण व जलसंपदा राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांनी खडे बोल सुनावले.
चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यातील आदिम कोलाम समुदायाच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या कोलाम विकास फाऊंडेशन संस्थेव्दारा सितागुडा या कोलाम गुड्यावर आयोजित कोलाम संवाद यात्रा व जनता दरबारात ते बोलत होते. यावेळी त्यांनी रायपूर - खडकी या कोलाम गुड्याला भेट देऊन कोलामांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नियोजित विकास आराखड्याचेही त्यांनी निरीक्षण केले व कोलामांच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
बच्चू कडू यांचे स्वागत पारंपरिक आदिवासी नृत्याने झाले. याच गुड्यावर त्यांनी मोकळ्या जागेत निवांत झोप घेतली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची झोप उडाली. आज ते या भागातील काही गावात भेटी दिल्या. व कोलाम जनता दरबाराच्या माध्यमातून आदिवासींचे प्रश्न जाणून घेतले. घरकुल योजनेत बेकायदेशीरपणे ठेकेदारांनी निकृष्ठ काम केल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत अहवाल तयार करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी यांना दिले. तालुका आरोग्य अधिकारी यांनी तालुक्यातील आजारी रुग्णांचे सर्व्हेक्षण करावे. गरजूंसाठी मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबीर लावू असेही त्यांनी सांगितले.
तहसिलदार यांनी खडकी रायपुर येथील सामूहिक वनहक्क दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रांची उपलब्धता करून द्यावी, गावोगावी प्रशासन पाठवून रेशन कार्ड काढून देणे, जात प्रमाणपत्र देणे यासाठी शिबिर लावावी असेही निर्देश दिले. तर खडकी रायपूर येथे जलसंधारण विभागामार्फत करता येऊ शकेल अशा कामाचे मायक्रो प्लॅनिंग करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
पुढील महिन्याभरात मी पुन्हा दौरा करून अधिकाऱ्यांच्या कामाची पडताळणी करेल असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोलाम विकास फाउंडेशनचे विकास कुंभारे, संचालन ॲड. दीपक चटप यांनी केले. यावेळी माजी आमदार ॲड. वामनराव चटप, तहसीलदार प्रवीण चिडे, गटविकास अधिकारी विजय पेंदोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे आदींची विशेष उपस्थिती होती.
या जनता दरबारात शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सय्यद शब्बीर जागीरदार,जय विदर्भ पार्टी चे जिल्हा प्रभारी सुधाम राठोड,प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष जिवन तोगरे,आम आदमी पक्षाचे तालुका सचिव गोविंद गोरे, विनोद पवार शेतकरी संघटनेचे तालुकाउपाध्क्ष , शेतकरी संघटनेचे नरसिंग हामणे, अॅड.नारायण माने, सामाजिक कार्यकर्ती सिंधु जाधव, रामेश्वर नामपल्ले इत्यादींनी तालुक्यातील समस्या मांडल्या बच्चु कडू साहेबांनी समस्या ऐकून घेतले आणि या समस्या बद्दल अधिकांऱ्याना खडेबोल सुनावलं व तंबी दिली.दौऱ्याच्या दरम्यान भीमनगर शेणगाव येथील समस्या जाणून घेतले व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
*आणि राज्यमंत्री बच्चु कडू यांनी रात्री कोलाम गुड्यावरच मुक्काम ठोकला.*
स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्याने या भागात भेट देण्याची आणि मुक्काम करण्याची ही पहिलीच घटना आहे. इथल्या कोलाम आदिवासींच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बच्चू कडू काल रात्री जिवती तालुक्यातील सीतागुडा येथे पोचले.
*बच्चू स्टाईलने अधिका-यांची भंबेरी उडाली*
फार उशीरापर्यंत ना. बच्चू कडू कार्यक्रम स्थळी पोहोचले नव्हते. त्यामुळे त्यांना कार्यक्रमात फारसा उत्साह राहणार नाही, असा अंदाज बांधणा-या अधिका-यांची खास बच्चू स्टाईल ने चांगलीच भंबेरी उडाली. त्यांनी रात्रौ उशिरापर्यंत कोलामांच्या पारंपरिक सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद लुटला. व रात्रौ तिथेच आराम करण्याचा निर्णय जाहीर केला. व सकाळी ६ च्या सुमारास आणखी काही कोलाम गुड्यावर जाण्याचा निर्णय केल्याने अधिका-यांची चांगलीच भंबेरी उडाली.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...