Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / महाराष्ट्र राज्य किसान...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

महाराष्ट्र राज्य किसान सभा, चंद्रपूर जिल्हा कौन्सिल चे जिल्हा अधिवेशन संपन्न

महाराष्ट्र राज्य किसान सभा, चंद्रपूर जिल्हा कौन्सिल चे जिल्हा अधिवेशन संपन्न

ब्रम्हपुरी :- अखिल भारतीय किसान सभा, संलग्न महाराष्ट्र राज्य किसान सभा चंद्रपूर जिल्हा कौन्सिल चे जिल्हा अधिवेशन मोठ्या उत्साहात गांगल वाडी येथे घेण्यात आला.

    ह्या अधिवेशनाचे उद्घाटक कॉम. अरुण वणकर, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य किसान सभा हे होते, ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. महेश कोपूलवार, राष्ट्रीय परिषद सदस्य, अखिल भारतीय किसान सभा हे होते, प्रमुख मार्गदर्शक कॉ प्रा नामदेव कंनाके, कॉम. देवराव चवळे, ॲड. जगदीश मेश्राम, कॉ. विनोद झोडगे,श्री. विनोद पाटील,धनंजय सहारे, कलाम भाई शेख,राजू गईनवार,रवींद्र उमाँटे,प्रकाश रेड्डी उपस्थित होते.


   ह्या अधिवेशनात देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती, केंद्र तसेच राज्य सरकारची धोरणं, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, तेंदू पत्त्याच्या बोनस चा प्रश्न, सिंचनाच्या सोयींचा प्रश्न, वाढत्या वीज बिलांचा प्रश्न, वन जमिनीच्या पट्ट्यांचा प्रश्न, गायरान जमिनीच्या पट्ट्यांचा प्रश्न, वाढत्या महागाईचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम ह्या सर्व विषयावर विस्तृत चर्चा झाली.


   देशातील शेतकऱ्यांनी जात, धर्म, पंथ असा भेदभाव विसरून भक्कम एकजूट करून आपल्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने लढा उभारून संघर्ष करण्याची गरज आहे, त्याशिवाय हे भांडवलदार धार्जिणे  सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार नाही, हे दिल्लीत १३ महिने सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने दाखवून दिले व सरकारला तीन कृषी कायदे मागे घ्यावे लागले. महाराष्ट्र राज्य किसान सभा ही शेतकऱ्यांची जनसंघटना असून ह्या संघटनेमध्ये कोणताही शेतकरी सभासद होऊ शकतो. असे प्रतिपादन कॉ. डॉ. महेश कोपुलवर ह्यांनी केले. ह्या अधिवेशनाला जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.


अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात उपस्थित प्रतिनिधींनी आप आपल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या व शेतीच्या समस्या मांडल्या. तसेच ह्या अधिवेशनामध्ये स्वामिनाथन आयोगाच्या शिफाशीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव शेतमालाला देण्यात यावा व तसेच खरेदी मालाचे चुकारे तात्काळ अदा करण्यात यावेत. शेतकरी शेमजूर व असंघटित क्षेत्रातील कामगारांना, ग्रामीण कारागिरांना वयाच्या ६० वर्षानंतर मासिक रू.५०००/- पेन्शनचा कायदा करण्यात यावा, जबरान जोत धारकांना वन जमिनीचे व गायरण जमिनीचे पट्टे तीन पिढ्यांची अट न ठेवता वाटप करण्यात यावेत, शेतीसाठी अल्प दरात पूर्णवेळ वीज पुरवठा करण्यात यावा, शेतीची दैनंदिन कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात यावीत, शेतीला लागणारे बी बियाणे, खते औषधे व उपकरणे स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात यावी, इत्यादी ठराव संमत करण्यात आले.


 ह्या अधिवेशनामध्ये जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली तसेच दिनांक २८ व २९ मे २०२२ रोजी शिरपूर जिल्हा धुळे येथे होणाऱ्या तिसाव्या राज्य अधिवेशनाकरिता प्रतिनिधींची निवड करण्यात आली. 
  ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद झोडगे ह्यांनी केले, संचालन पदमाकर रामटेके,आभार प्रदर्शन महेंद्र नाण्वाडकर यांनी केले. सदरच्या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी दुर्योधन शेंडे,रणदीप मेश्राम,अतुल टेम्भुरने,देवेंद्र भररे, तुकाराम राऊत, रामदास सालोटकर,संजय खोकले,हिरालाल नागपुरे  ह्यांनी परिश्रम घेतले.
दिनांक :-15 मे 2022
ठिकाण:-ब्रम्हपुरी

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...