Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / राज्य महामार्गावरील...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

राज्य महामार्गावरील भिषण अपघातात युवा प्राध्यापिकेचा जागीच मृत्यू कारच्या धडकेत दुचाकी चक्काचूर - वनिता चिडे कालवश तर बंधु विठ्ठल गोरे गंभीर जखमी.

राज्य महामार्गावरील भिषण अपघातात युवा प्राध्यापिकेचा जागीच मृत्यू कारच्या धडकेत दुचाकी चक्काचूर - वनिता चिडे कालवश तर बंधु विठ्ठल गोरे गंभीर जखमी.

कोरपना:  तेलंगणाच्या आदिलाबाद पर्यंत जाणारा राज्य महामार्ग अपघातांचे केंद्रबिंदू ठरत असून त्यातल्यात्यात शेवटचा तालुका असलेल्या कोरपना परिसरात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असुन कल सायंकाळी जवळपास 6:30 वाजता तालुक्यातील सोनुर्ली जवळ एका कार ने दुचाकीला दिलेल्या धडकेत राजुरा येथील भावी प्राध्यापिका वनिता चिडे ह्यांचे घटनास्थळीच निधन झाले असुन त्यांचा भाऊ विठ्ठल गोरे रा. घोडपेठ ता. भद्रावती हे गंभीर जखमी झाले आहे.


   प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रामकिसन चिडे हे आपली पत्नी वनिता तसेच साळा विठ्ठल गोरे व त्यांची पत्नी असे चौघे दोन दुचाकीने तेलंगणा राज्यातील बेला येथे लग्नाला गेले होते. लग्नानंतर राजुरा येथे परत येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या टी एस २० ए ६८७२ क्रमांकाच्या कार ने आपल्या भावासोबत येत असलेल्या वनिता चिडे ह्यांच्या एम एच ३४ सी बी ४३९२ क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.ही धडक इतकी जोरदार होती की वनिता चिडे ह्यांचा जागीच मृत्यु झाला तर त्यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला असुन चालक बंधु विठ्ठल गंभीर जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले असुन त्यांच्या पायाला जबर मार लागला आहे.

 

 दुसरीकडे धडक देणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार सुद्धा उलटली असुन कार ने तीन ते चार वेळा पलटी घेतली असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच कोरपनाचे ठाणेदार सदाशिव ढाकणे हे घटनास्थळी दाखल झाले मात्र परिस्थिती तणावाची असल्याने त्यांनी नागरिकांना विश्वासात घेऊन अखेर पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी गडचांदुर येथे हलविण्यात आला. रात्रीच शवविच्छेदन करून पार्थिव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला असुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...