Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / कौतुकास्पद ! सिनूच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

कौतुकास्पद ! सिनूच्या रूपाने पुन्हा एकदा प्रामाणिकतेचे दर्शन -भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

कौतुकास्पद ! सिनूच्या रूपाने पुन्हा एकदा प्रामाणिकतेचे दर्शन    -भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

लोखंडी पुलाजवळ मिळालेली दागिन्यांनी भरलेली पर्स सिनू इसारपने केली महिलेला सुपुर्द.

देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): (घुग्गुस /१४ मे)  आजच्या या स्वार्थी जगात प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे, याचा प्रत्यय अधूनमधून आपल्याला येतच असतो. असाच प्रामाणिकपणाचा अनुभव काल सकाळी घुग्घुस शहरात पहावयास मिळाला. येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप हे संध्याकाळच्या सुमारास काही कामानिमित्त लोखंडी पुलाजवळून जात असतांना त्यांना रस्त्याच्या कडेला एक बेवारस पर्स पडलेली दिसली. त्यांनी उत्सुकतेपोटी त्या पर्सची पाहणी केली असता त्यामध्ये एखाद्या महिलेचे काही दागिणे, रोख रक्कम व मोबाईल फोन असल्याचे दिसले. हे बघून इसारप यांनी जराही विलंब न करता चौकशी केली आणि ती पर्स शहरातीलच केमिकल नगर परीसरातील सौ.  निलिमा दीपक काळे यांची असल्याचे समजले.

सिनू इसारप यांनी सौ. निलिमा काळे यांना भेटून त्यांची पर्स पोलिसांसमोर जैसे थे परत केली. आपली हरवलेली पर्स मिळाल्याने सौ. निलिमाताईंचाही जीव भांड्यात पडला. आणि त्यांनी सिनू इसारप यांचे आभार मानले. इसारप यांच्या प्रामाणिकतेची ही बातमी संपूर्ण घुग्घुस शहरात वाऱ्यासारखी पसरली. पैशासह दागदागिने असलेली पर्स सापडूनही सिनू यांनी कुठलाही मोह न ठेवता ती पर्स सुपूर्द केल्याने त्यांच्या प्रामाणिकतेचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सिनू यांच्या या आदर्शवत कार्याबद्दल कळताचं भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सुद्धा सिनू यांचं कौतुक केलं.  माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे हे मानवतेचे खरे लक्षणआहे. परंतु आज हा गुण दुर्मीळ होत असला तरी जगात अशी अनेक माणसं आहेत की जी वेळप्रसंगी कोणताही स्वार्थ न बाळगता अनोळखी लोकांची सुद्धा मदत करतात. ती मदत छोटी की मोठी, आर्थिक की मानसिक हे मुद्दे गौण आहेत. 

त्यावेळेस महत्त्वाचा असतो तो फक्त माणुसकीचा धर्म ! आणि तो सिनूने आपल्या आजच्या कार्यातून दाखवून दिला आहे. सिनू शहरातील आदर्श लोकप्रतिनिधी आहेच, परंतू आजच्या या घटनेने त्याच्यातील चांगुलपणाचेही दर्शन झाले. अशी भावना देवराव भोंगळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...