वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर - गावातील माणुस शंभर वर्ष जगला पाहिजे याचे नियोजन करा. गावाच्या विकास करण्यासाठी आमदार खासदार येणार नाही. तुम्हालाच त्यासाठी प्रयत्न करावे लागेल.
त्यासाठी ग्रामपंचायत आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण करा. त्यासाठी गावकऱ्यांना आपण गावाचे काही देणे लागतो, याची जाणीव करुन द्या. तेव्हाच गाव आदर्श होईल, असे प्रतिपादन राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त पाटोदाचे सरपंच भास्कर पाटील पेरे यांनी केले.
ग्रामविकास महोत्सव समितीच्या वतीने काल सोमवारला पिपरी येथे पेरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन माजी सरपंच पारस पिंपळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे तर उद्घाटन म्हणून इन्स्पायरचे संचालक प्रा. विजय बदखल यांनी केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पिपरीच्या सरपंच सरपंच वैशाली माथने, उपसरपंच हरि ओम पोटवडे, प्रा. राजेश पेचे, नगरसेवक पप्पू देशमुख, प्रमोद काकडे, नितू चौधरी, डॉ. निखिल टोंगे, दिनेश कष्टी, रणजित डवरे, नितीन बन्सोड उपस्थिती होते. यावेळी ग्रामविकासाची संकल्पना मांडताना पेरे यांनी पंचसुत्री दिली. शिक्षण, आरोग्य, पाणी, आर्थिक स्वयंपूर्णता आणि पर्यावरण महत्वाचे असल्याचे सांगितले. गावातील माणस जगविण्यासाठी झाडे जगविणे आवश्यक आहे. प्रथा, परंपरा एका दिवसात बदलणार नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावा लागेल. प्रत्येक गावकरी ग्रामविकासाच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होवू शकत नाही. ते शक्यही होणार नाही. परंतु आदर्श गावाच्या संकल्पनेत प्रत्येक ग्रामस्थांचे योगदान महत्वाचे आहे. ते पैशाच्या स्वरुपात तुम्ही घेवू शकता. गावकऱ्यांकडून घेतलेल्या पैशाची दुप्पट परतफेड तुम्हाला विविध सोयी-सुविधांतून करता आली पाहिजे. त्यासाठी ग्रामपंचायतने व्यावसायिक दृष्टीकोन बाळगायला हवा. शासकीय योजनांचा लाभ घेता आला पाहिजे. गाव बदलण्याची प्रक्रीया बाहेरची व्यक्ती येवून करणार नाही. त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावा लागेल, असा सल्ला पेरे यांनी दिला. तुम्हाला पेरे यांचे विचार एेकून थांबायचे नाही. पुढच्या वेळेला ते येतील तेव्हा पिपरी आदर्श गाव म्हणून ओळखले जावे, अशी इच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केली. उद्घाटक प्रा. विजय बदखल यांनी ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाली तरच आदर्श गावाची पायाभरणी होवू शकते असे सांगितले. यावेळी प्रा. राजेश पेचे, नगरसेवक पप्पू देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात पारस पिंपळकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील पार्श्वभूमी विशद केली. यानिमित्ताने आदर्श गावाची संकल्पना गावकऱ्यांनी कळेल. त्या मार्गाने आमची वाटचाल सुरु होईल. त्यासाठी हा प्रशिक्षण वर्ग असल्याचे पिंपळकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्नाने पेरे यांच्या हस्ते अविनाश पोईनकर , अॅड. दीपक चटप, सुधाकर मडावी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य गणेश आवारी,ज्योती पिंपळकर, माया मुसळे. सुनीता मत्ते, पोलिस पाटील डॉ. दिलीप निब्रड, संतोष मत्ते, विठ्ठल पिंपळकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वतीतेसाठी विठ्ठल भोयर, महेंद्र बेरड, राहूल चौधरी, आशिष पिंपळकर आदींनी परिश्रम घेतले. संचालन रंगराव पवार तर आभार संदीप पिंपळकर यांनी मानले. या कार्यक्रमाला चंद्रपूर तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...