Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / घुग्गुस शहरातील विजेचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

घुग्गुस शहरातील विजेचा लपंडाव १५ दिवसात थांबवा, अन्यथा MSCB विरोधात तीव्र आंदोलन!

घुग्गुस शहरातील विजेचा लपंडाव १५ दिवसात थांबवा, अन्यथा MSCB विरोधात तीव्र आंदोलन!

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा विद्युत वितरण कंपनीला निवेदनातून इशारा.|| येत्या पंधरा दिवसांत समस्या निकाली काढण्याचे अधिक्षक अभियंत्यांचे आश्वासन. .

गेल्या महिन्या भरापासून घुग्घुस शहरात सातत्याने सुरू असलेला विजेचा लपंडाव तातडीचे थांबवून स्थानिकांना होणारा त्रास कमी करावा. अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आज अधिक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे यांना भेटून दिलेल्या निवेदनात केली आहे. 

महिन्या भरापासून घुग्घुस शहरात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. ऐण उन्हाळ्यातच वारंवार शहराची बत्ती गुल होत असल्याने नागरिकांची लाही लाही होत आहे. 
घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने येथे वेकोलीसह अनेक मोठ्या कंपन्या आहेत. आणि विजेच्या अशा लपंडावाने त्यांनाही याचा फटका बसत आहे. शहरात पाऊस सदृश स्थिती किंवा कोणतेही वादळ, वावटळ नसतांना सुद्धा केव्हाही विज खंडित होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहे. 
त्यामुळे या समस्येला गांभीर्याने घेऊन तातडीने शहराचा वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा स्थानिक विज   वितरण केंद्रावर आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा बैठकीदरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी एमएसईबी प्रशासनाला दिला.

यावेळी बोलताना, घुग्घुसच्या या गंभीर समस्येच्या सोडवणूकीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. तसेच या संदर्भातील तांत्रिक कामे जवळपास पूर्ण होण्याच्या प्रक्रियेत आहेत. आणि येत्या पंधरा दिवसांत आम्ही ही समस्या निकाली काढू असे आश्वासन अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे यांनी दिले.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...