Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / घरफोडी करणारा रामनगर...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

घरफोडी करणारा रामनगर पोलिसांच्या ताब्यात

घरफोडी करणारा रामनगर पोलिसांच्या ताब्यात

चंद्रपूर :- दिनांक ०५/०५/२०२२ रोजी फिर्यादी नामे निभा रविंद्रनाथ रॉय, वय-५८ वर्ष, रा. विना अपार्टमेंट जवळ, प्रगतीनगर, चंद्रपुर यांनी पोलीस स्टेशन, रामनगर येथे तक्रार दिली की, दिनांक ०४/०५/२०२२ रोजी सकाळी ०५:०० वाजता दरम्यान फिर्यादी, पती रविद्रनाथ रॉय असे मिळुन मुलगी नामे अनुश्री रॉय हिला भेटण्याकरीता रा. वडसा जि. गडचिरोली येथे गेले असतांना फिर्यादीचे घरी राहणारे किरायदार यांनी फिर्यादीचे पती यास फोन करून तुमचे घराचे लॉक तुटलेले आहे असे सांगितले वरुन फिर्यादी व पती असे वडसा येथुन घरी परत आले येवुन पाहीले असता घराचे आलमारी मधील सोन्याचे दागीने व रोख रक्कम असे एकुण १, ४०,०००/-रू. माल अज्ञात चोराने चोरून नेला अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे रामनगर अप.क्र. ४४२ / २०२२ कलम ४५४, ४५७, ३८०, भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.

नमुद गुन्हयाचे गांभीर्य बघता मा. पो.नि. राजेश मुळे, सपोनि हर्षल अकरे, पोउपनि विनोद भुरले व डि.बी. स्टॉफ असे गुन्हयाचे घटनास्थळी तात्काळ भेट देवुन गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी डी. बी. पथकातील अधिकारी व कर्मचारी हे पोलीस स्टेशन हद्दीत रवाना होवुन घटनास्थळाचे आजुबाजुचे परिसातील माहिती तसेच गोपनिय बातमिदाराचे माहिती वरून आरोपी आशिष उर्फ आशु श्रीनिवास रेड्डीमला, वय-२२ वर्ष, रा. डिस्पेन्सरी चौक, रयतवारी कॉलनी, चंद्रपुर यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह केल्याची कबुली दिली. त्यावरून नमुद आरोपीकडुन सोन्याच्या दागिन्यांसह एकुण १,१०,१००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे सा. चंद्रपुर, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक श्री. राजेश मुळे, सपोनि हर्षल ओकरे, पोउपनि विनोद भुरले, पो. हवा. रजनीकांत पुट्ठावार, पोहवा / ०९ पेतरस सिडाम, मरस्कोले विनोद यादव, किशारे वैरागडे, पुरुषोत्तम चिकाटे, आंनद खरात, निलेश मुडे, पांडुरंग वाघमोडे, सतिश अवथरे, लालु यादव, विकास जुमनाके, हिरालाल गुप्ता यांनी कारवाई पार पाडली

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...