Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / राजाश्रय असलेला "कृष्णरथ"...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

राजाश्रय असलेला "कृष्णरथ" अवैध रेती तस्करीत जप्त

राजाश्रय असलेला

पिंपळगाव (भो) येथील स्थानिकांच्या "राजकीय चतुराईने" रेती तस्करीतील वाहन पोलीसांच्या स्वाधीन

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी तालुक्यात रेती चोरीचे प्रमाण मोठे असून घाट लिलाव होण्यापूर्वी होणारी रेती तस्करी, काही घाट सुरु झाल्यानंतर सुद्धा मोठ्या जोमात होतं असून वैध आणि अवैध च्या खेळात रेती तस्करीचा प्रमाण बिनबोभाट पणे सुरु आहे. आज तालुक्यात राजाश्रयाने अवैध तस्करीत गुंतलेला वाहन काही स्थानिकांनी राजकीय चतुराईने पकडून स्वतः पोलीस स्टेशनं च्या स्वाधीन केल्याने खळबळ उडाली आहे.

पिंपळगाव (भोसले) येथे अवैध गौण खनिज रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर क्र. एम एच ३४ बीएफ ८१३४ व वीणानंबर रेती भरलेली ट्रॉली स्थानिक सरपंच व गावकऱ्यांनी शनिवारला सकाळच्या सुमारास पकडून वाहन पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे कायदेशीर कारवाई साठी जमा केला. पोलीस कारवाई मध्ये रेती वाहतुकीचा परवाना नसल्याची बाब ट्रॅक्टर चालक सोपान मधुकर ढोंगे वय 24 रा. पिंपळगाव (भोसले) याने कबूल करीत ट्रॅक्टर मधील रेती पिंपळगाव घाटातून चोरल्याचे सांगत आहे. ट्रॅक्टरचालक याच्याकडून ट्रॅक्टर व ट्रॉली अंदाजे किंमत ५ लाख व १ ब्रास वाळू अंदाजे किंमत ५ हजार असे एकुण ५ लाख ५ हजार रूपयांचा मुद्देमाल मिळून आला.तर वाहन मालक नांदगाव येथील एक मोठ्या राजकीय पक्ष्याचा पुढारी असल्याचे समजत आहे.

अवैध रेती तस्करी राजकीय प्रभावाने सुरु असल्याने त्यावर प्रतिबंध लावावे अशी मागणी राजकीय मंडळी प्रशासनासमोर मांडत नाहीतं व साधारण नागरिकांच्या जीवाचा खेळ मांडत "वाहत्या गंगेत हात धुण्याचा" प्रयत्न करीत असतात असे आज नागरिकांतून खुलेआम चर्चीले जातं असून सदर वाहणावर जप्ती पंचनामा तयार करून जप्त करण्यात आला असून रेती परवाना नसतांना अवैधपणे वाळूची वाहतूक करून शासनाचे महसूल चोरी केल्याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलिसांनी आरोपीच्या विरूद्ध ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहेत.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...