Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / पडोली येथील आमरण उपोषणास...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

पडोली येथील आमरण उपोषणास शिवसेना महिला आघाडीचा पाठींबा

पडोली येथील आमरण उपोषणास शिवसेना महिला आघाडीचा पाठींबा

चंद्रपुर :- पडोली चौकात वाहतूक नियंत्रण सिग्नल लावण्यात यावे या मुख्य मागणीसाठी माजी सैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास चंद्रपूर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पाठींबा दिला.
चंद्रपुरातील सर्वात जास्त व्यस्त असलेल्या पडोली चौकात वाहतूक नियंत्रण सिग्नल लावण्यात यावे, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मार्केटला जाणाऱ्यांची जास्त रहदारी असल्यामुळे पार्किंग व नो पार्किंग चे बोर्ड लावण्यात यावे, कोसारा चौक ते पडोली चौक या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट परत सुरू करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी ३ मे पासून मनोज ठेंगणे आमरण उपोषणास बसले आहे.
या चौकात अनेक छोटे-मोठे अपघात नेहमी होत असतात. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पडोली चौकात सिग्नल लावणे आवश्यक आहे. यासह अन्य मागण्या रास्त असल्याने शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्हा संघटक सौ उज्वला प्रमोद नलगे यांच्या नेतृत्वात आज ६ मे रोजी उपोषण मंडपास भेट देत उपोषणास जाहीर पाठींबा दिला.
यावेळी माजी जिल्हा संघटक कुसुम उदार, मूल तालुका संघटक रजनी झाडे, नागाळा (सि.) ग्रामपंचायत सरपंच रंजना कांबळे, नागाळा (सि.) सदस्य निर्मला कामडी, सद्दाम कनोजे, सुष्मित गौरकार, चेतन कामडी, निखील घाडगे, सुप्रित रासेकर, ज्ञानेश्वर लोनगाडगे, रोहन नलगे यांच्यासह महिला आघाडी, शिवसेना, युवासेना शिवसैनिकांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...