वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): आधी रोजगार,प्रदूषण व आरोग्याचे प्रश्न सोडवा मगच लोयड्स मेटल्स कंपनीचा विस्तार करा अशी मागणी घुग्गुस तसेच लगतच्या गाववासीयांनी केली आहे.आज शुक्रवारी लोयड्स मेटल्स कंपनीच्या विस्तारीकरणासाठी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती.या जनसुनावणी मध्ये नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत कंपनी व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
तालुक्यातील घुग्गुस शहराच्या मध्यभागी लोयड्स मेटल अँड एनर्जी कंपनी आहे.या कंपनीतून स्पंज आयर्न चे उत्पादन घेतले जात असून प्रदूषणामुळे घुग्गुस शहर व परिसरातील गावं प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत.
अशा परिस्थितीत या कंपनीच्या विस्तारीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या असून आज जनसुनावणी घेण्यात आली.मात्र या जनसुनावणी मध्ये प्रदूषणाच्या मुद्द्यावरून गोंधळ उडाला.तसेच रोजगार देण्यात यावा,शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान होत असून याकडे लक्ष द्यावे,प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात यावा,प्रत्येक गावात आरोग्य शिबीर आयोजित करण्यात यावे अशा विविध मागण्या या जनसुनावणी मध्ये करण्यात आल्या आहेत.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...