वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
पडोली चौकात पार्किंग, सिग्नल, स्ट्रीट लाईट व सिसिटीवी लावण्यासाठी पुर्व माजी सैनिक मनोज ठेंगणे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
दिनांक 3 मे पासून पडोली चौकात आमरण उपोषण सुरु करण्यात आले असून तीन दिवसापासून उपोषण सुरु आहे.
पडोली चौकात सिग्नल नसल्याने अपघात होत आहे. हायवे रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट बंद आहे व पार्किंगची व्यवस्था नाही आहे ही सुविधा उपलब्ध करणे तसेच पडोली ते कोसारा गावा पर्यंत सिसिटीवी कॅमेरे लावण्यासाठी माजी सैनिक मनोज ठेंगणे यांनी 3 मे पासून आमरण उपोषण सुरु केले आहे.
पडोली चौकातून पडोली ते करंजी हायवे क्र 7 जातो व चंद्रपूर नागपूर हायवे जातो 24 तास बाहेर राज्यातील येणारी जडवाहतूकची दिवस रात्र वर्दळ सुरु असते आता पर्यंत अनेक अपघात घडले आहे आता पर्यंत प्रशासनाने पडोली चौकात सिग्नल नाही लावले व स्ट्रीट लाईट बंद आहे तसेच सिसिटीवी कॅमेरा सुद्धा बंद आहे. नागपूर येथे जाणाऱ्या प्रवासीयांना बसण्यासाठी जागा नाही व पार्किंगचा अभाव आहे. पडोली चौकात बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक, खाजगी बँक, कॉलेज, शाळा, व व्यापारी प्रतिष्ठान कार्यालय आहे त्यामुळे मोठया प्रमाणात ये जा सुरु असते एमआयडीसी, तडाळी, चंद्रपूर एमआयडीसी परिसरसतील अनेक कामगार व मजूर यांचे ये जा सुरु असते त्यामुळे या चौकात सिग्नलची अत्यंत आवश्यकता आहे परंतु प्रशासनाने सिग्नल लावले नाही लवकरात लवकर प्रशासनाने या चौकात सिग्नल लावावे या मागणी साठी पुर्व माजी सैनिक मनोज ठेंगणे यांनी 3 मे पासून पडोली चौकात आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषण मंडपात मनोज ठेंगणे, विनोद खडसे, विक्की लाडसे, विक्की रेंगटीवार, शशिकांत पिसे, मोनू ठाकूर, दिनेश इंगे, अब्बास मोहम्मद, सुरज मेघवानी, राकेश बोरीकर, बादल कडुकर बसले होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...