Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / न्यायदानाच्या माध्यमातून...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

न्यायदानाच्या माध्यमातून देशसेवा करा : ऍड. मुरलीधर गिरडकर.

न्यायदानाच्या माध्यमातून देशसेवा करा : ऍड. मुरलीधर गिरडकर.

ज्युडीशनल मॅजीस्ट्रेट परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थीनीचा सत्कार; सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर चा स्तुत्य उपक्रम

राजुरा - सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील ज्युडीशनल मॅजीस्ट्रेट प्रथम वर्ग परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा त्यांच्या गावात जाऊन तेथील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने सत्कार समारंभाचे आयोजन राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथे करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपीठ नागपूरचे न्यायिक सदस्य मुरलीधरराव गिरडकर यांनी सांगितले की, न्यायदान हे पवित्र कार्य असून ते प्रमाणिक, निष्ठापूर्वक व पारदर्शकता ठेवून करणे हे आपले कर्तव्य आहे. न्यायदानाच्या माध्यमाने देशसेवेसाठी ज्यूडिशनल मॅजिस्ट्रेट प्रथम वर्ग परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थिनींचा सत्कार करताना सांगितले. यावेळी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या या नाविण्यपूर्ण स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

सर्वोदय शिक्षण मंडळाच्या वतीने राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथे सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील ज्युडीशनल मॅजीस्ट्रेट प्रथम वर्ग परीक्षेत उत्तीर्ण बामनवाडा येथील कु. ललीता ताराचंद टाकभौवरे-करमनकर आणि चंद्रपूर येथील कु. निकिशा अशरफ खाँ पठाण यांचा जाहिर सत्कार मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती तथा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपिठ नागपूर चे न्यायीक सदस्य मुर्लीधरराव गिरडकर यांच्या हस्ते शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष तथा राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रमुख अतिथी म्हणून राजुरा चे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, राजुरा बार असोसिएशन चे अध्यक्ष निनाद येरणे, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, राजुरा येथील ॲड. अरूण धोटे, ॲड. सदानंद लांडे, सिद्धार्थ पथाडे, अविनाश जाधव, डॉ. सत्यपाल कातकर, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी वारकड, चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर, बामनवाडा चे सरपंच भारती पाल, उपसरपंच अविनाश टेकाम, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजली हस्तक, मिलींद संजोग मंडळ बामनवाडा चे अध्यक्ष आक्रोश जुलमे, रमाबाई महिला मंडळ बामनवाडा चे अध्यक्ष मायाबाई वाघमारे, मुख्याध्यापक अविनाश गुरमुखी, विजय पाटील, रामदास गिरडकर, राजकुमार डावर, बंडू नगराळे, नंदकिशोर माहोरकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अंजली हस्तक  यांनी संचालन, काजी मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार रामदास गिरडकर यांनी मानले.

याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती तथा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपिठ नागपूर चे न्यायीक सदस्य मुर्लीधरराव गिरडकर, बार असोसिएशन चे अध्यक्ष निनाद येरणे, राजुराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांचाही सत्कार करण्यात आला. सत्कारमुर्ती विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतल्या यश पदरी पडण्यास वेळ लागणार नाही अशा भावना व्यक्त करीत विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहीत केले. याप्रसंगी ग्राम पंचायत चुनाळा च्या वतीने सरपंच बाळनाथ वडस्कर व सदस्यांनी यश प्राप्त केलेल्या दोन्ही विद्यार्थीनींचा सत्कार केला.
मान्यवरांचे स्वागत शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाद्वारे व स्वागतगिताने केले. यानंतर निळी पहाट चंद्रपूर द्वारा प्रस्तुत बुद्ध भिमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.  बामनवाडा येथील छोट्याशा गावातील  व गरीब कुटूंबातील मुलीचा जाहिर सत्कार त्यांच्याच गावी जाऊन केल्याबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...