Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / युवकांनी दाखविली प्रामाणिकपना,...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

युवकांनी दाखविली प्रामाणिकपना, १७ हजार ५०० रुपयांची सापडलेली रक्कम केली परत.

युवकांनी दाखविली प्रामाणिकपना, १७ हजार ५०० रुपयांची सापडलेली रक्कम केली परत.

युवकांवर कौतुकाचा वर्षाव.

आवाळपूर :- अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या वसाहतीत घरघुती गॅस  सिलेंडर इजेंसी असल्याने नांदा येथील दोन युवक गॅस भरण्यास गेले असता त्यांना रस्त्यावरती प्लास्टिक मध्ये रोकड दिसून आली. त्यांनी रक्कम परत करून एक प्रामाणिक पनाचा आदर्श दाखवून दिला.

सविस्तर वृत्त असे की, नांदा येथील गौरव बंडू वरारकर व योगेश बंडू नांदेकर,हे दोघेही अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या वसाहतीत असलेल्या गॅस सिलेंडरच्या गोडाऊन कडे जात असतांना यांना प्लास्टिक मध्ये असलेली १७ हजार ५०० रुपयांची रक्कम रस्त्याच्या बाजूला पडलेली आढळली.

युवकांनी क्षणाचा विलंब न करता रस्त्याच्या कडेला पोस्ट ऑफिस लागून असल्याने तेथील कुणाचे तरी रक्कम पडली असावी असा त्यांना अंदाज आला. याची माहिती पोस्ट ऑफिस मॅनेजर यांना दिली. आणि त्यांनी ही रक्कम ज्याची असेल त्यांना द्या अशी विनंती करत त्यांनी ती रक्कम मॅनेजर यांचा कडे सुपूर्त केली.

गावातीलच शकर निवलकर यांचे पैसे असल्याने ते शोधत पोस्ट ऑफिस जवळ गेले तिथे जाऊन मॅनेजर ला विचारणा केली मॅनेजर ने सुध्दा खात्री करूनच त्यांचे पैसे परत केले.

गौरव हा इंजिनीरिंग करत आहे तर योगेश यांनी १२वी ची परीक्षा दिली आहे. विशेष म्हणजे योगेश यांच्या वडीलाचे नुकतेच निधन झाले त्यामुळे पैशाची चणचण आहेच तरी देखील लालसा न बाळगता ज्याचे पैसे त्याला मिळावे या हेतूने प्रामाणिकता दाखविल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

(पोस्ट ऑफिस कार्यलयात कामानिमित्त गेलो असता माझ्याकडून रक्कम कसे पडले लक्षातच आले नाही मात्र घरी आल्यानंतर माझ्या लक्षात आले की माझी रक्कम कुठंतरी पडली तसाच मी कार्यलयाच्या दिशेने निघालो तिथे जाऊन विचारपूस केली तर मॅनेजर साहेबांनी खात्री करून तुमच्याच गावातील मुलांनी रक्कम परत दिली आहे घेऊन जा या दोघांचे मी मनापासून आभार मानतो आणि योगेश व गौरव च्या प्रामाणिकपणाचे तोंड भरून कौतुक करतो यांच्यामुळे माझे पैसे मला परत मिळाले.
शंकर निवलकर नांदा)

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...