Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / गुन्हे दाखल झाले तरी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

गुन्हे दाखल झाले तरी चालेल,ती देशी दारू भट्टी सुरू होऊ देणार नाही : राहुल पावडे.

गुन्हे दाखल झाले तरी चालेल,ती देशी दारू भट्टी सुरू होऊ देणार नाही : राहुल पावडे.

सुरू झालेले दारू दुकान नागरिकांनी शुक्रवारी पाडले बंद || राहुल पावडें यांचा पुढाकार.

जगनाथबाबा नगरातील रामसेतूच्या पायथ्याशी मंजूर केलेले देशी दारू दुकान व बियर शॉपी रद्द करण्यासाठी माजी उमहापौर राहुल पावडे यांच्या नेतृत्वातील जगनाथबाबा  नगर दारूबंदी संयुक्त संघर्ष समितीने एल्गार पुकारला आहे.या समिती द्वारे जनमत चाचणी सुरू असतानाच शुक्रवारी 29 एप्रिलला रामसेतू जवळ सुरू करण्यात आले.या प्रकाराने जगन्नाथ बाबा नगर दारूबंदी संयुक्त कृती समिती संतापली आहे.याची माहीती मिळताच माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी नागरिकांच्या सन्मुख चालू झालेले दुकान सायंकाळच्या सुमारास बंद पाडल्याने.काही काळ तणाव निर्माण झाला.या देशी दारू दुकानाचा लोकांना होणारा त्रास लक्षात घेता,गुन्हे दाखल झाले तरी चालेल,पण ही देशी दारू भट्टी सुरू होऊ देणार नाही,अशी भूमिका राहुल पावडेंनी घेतल्याने चालू केलेले दुकान बंद करावे लागले.

काही दिवसांपूर्वी जगन्नाथबाबा मठा जवळ रामसेतूच्या पायथ्याशी देशदारुची भट्टी व बियर शॉपिला परवानगी देण्यात आली.या घटनेचा तीव्र निषेध करीत जनतेने  हा प्रयत्न हाणून पाडला,आणि दुकान सुरू झालेच नाही.18 एप्रिलला पावडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाला नागरिकांच्या संयुक्त हस्तक्षराचे निवेदन दिल्यावर,20 एप्रिलला जगनाथबाबा मठात पावडे यांच्या नेतृत्वात जगन्नाथ बाबा नगर दारूबंदी संघर्ष समिती गठीत करण्यात आली.या समितीने राहुल पावडे यांच्या नेतृत्वात एल्गार पुकारला. आदोलनाचे विविध टप्पे ठरविले आहेत. यात पत्र भेजो व जनमत चाचणी,मोर्चा व निदर्शनेचा समावेश आहे.जनमत चाचणीचा समावेश होता.यासाठी समितीच्या सदस्यांनी *'डोअर टू डोअर'* सम्पर्क सुरू केला.नवीन देशी दारू दुकान व बियर शॉपिला जेष्ठ नागरिक संघाने विरोध दर्शवून एल्गार आंदोलनास समर्थन दिल्या नंतर आता जगन्नाथ बाबा मठ समिती, जगन्नाथ बाबा नवजीवन योग मंडळ, योग नित्य परिवार स्वावलंबी नगर,जगन्नाथ बाबा योग नित्य परिवार, चांदा पब्लिक स्कूल समिती, रेव्हेन्यू कॉलनी, संकल्प कॉलनी अश्या विविध संघटनांनी एल्गार आंदोलनास पाठिंबा देत कम्बर कसली.वाढता प्रतिसाद लक्षात घेता जनतेच्या भावनांचा उद्रेक झाल्यास यास,जिल्हा प्रशासन जवाबदार राहील अशी चेतावणी राहुल पावडे यांनी दिली होती.तरीही शुक्रवारला देशी दारू दुकान सुरू करण्यात आले.राहुल पावडे यांनी कार्यकर्त्यांसह आगेकूच करीत दुकान बंद पडल्याने नागरिक सुखावले.

यावेळी जगन्नाथ बाबा नगर दारूबंदी संयुक्त संघर्ष समितीच्या  पूनम पाटिल,जया अशोक चहांदे, अनिता र. मोहुर्ले, प्रमिला कुंभारे, गायत्री नंदनवार, मनोज पदलमवार, डॉ.संजय बेले,देविदास नंदनवार, आर.एम गहलोत, वासुदेव शास्त्रकर,सूर्यकांत बुरडकर,महेश राऊत याची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...