आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती :- एकच ध्यास स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवू घेऊ हमखास हे नारे देत जिवतीत विदर्भवादी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त काळा दिवस साजरा केला. यावेळी विदर्भवाद्यानी तहसील कार्यलया समोर नारे देत, काळ्या फिती बांधून, महाराष्ट्र शासनाच्या च्या प्रत्येक कार्यालया च्या ठिकाणी महाराष्ट्र शासन ऐवजी विदर्भ शासनाचे स्टिकर लावत काळा दिवस साजरा केला.
यावेळी उपस्थित विदर्भवादी सय्यद शब्बीर जागीरदार शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष, देविदास वारे स्वतंत्र भारत पक्ष तालुकाध्यक्ष, सुदाम राठोड विदर्भ युवा आंदोलन समिती जिल्हा अध्यक्ष, विदर्भवादी गोविंद गोरे आम आदमी पार्टी ता.सचिव, जिवन तोगरे प्रहार रुग्ण सेवक, रियाज सय्यद जय विदर्भ पार्टी तालुकाध्यक्ष विनोद पवार शेतकरी संघटना ता. उपाध्यक्ष, उद्धव गोतावळे दलित आघाडी तालुकाध्यक्ष, नरसिंग हामणे तालुका समन्वयक शेतकरी संघटना, ज्ञानेश्वर आडे, पुर्थ्वीराज राठोड, आदींची उपस्थिती होती. यावेळी विदर्भवाद्यानी स्वतंत्र विदर्भ राज्य का वेगळे व्ह्यायला हवे या संदर्भाचे पत्रक वाटप करत लोकांमध्ये जनजागृती केली आणि विदर्भाची दैनिय अवस्था समजावून सांगितली.
०१ मे १९६० रोजी विदर्भाला बळजबरीने महाराष्ट्रामध्ये सामावून घेतले असून विदर्भावर सतत अन्याय करत असल्याचे लोकांना पटवून सांगितले. विज विदर्भाची उजेड मात्र पश्चिम महाराष्ट्रात, पाणी विदर्भाचे आणि मोठमोठे उद्योग मात्र मुंबई पुण्यामध्ये, कापूस विदर्भाचा कापड कारखाने मात्र पश्चिम महाराष्ट्रात, तेवीस प्रकारचे खनिज संपत्ती मात्र विदर्भात आणि लोडशेडिंग विदर्भाच्याच नशिबी? विदर्भातील तरुणांच्या भविष्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य काळाची गरज आहे, कारण आपण एक हजार वर्षे जरी महाराष्ट्रात राहिलो तरी आपला विकास होणार नाही, आपण ६२ वर्षांपासून महाराष्ट्रात आहो तरी आपल्याला आतापर्यंत दैनंदिन गरजा सुद्धा मिळाल्या नाहीत म्हणून आवश्यक त्या सोई सुविधा मिळण्यावाचून पासून ६२ वर्ष झाले तरी विदर्भातील जनता मोठ्या प्रमाणावर वंचित आहे महाराष्ट्र शासनाची कोणतीच योजना आमच्या नशिबी नाही, कारण विदर्भातील शेतकऱ्यांचे मरण हेच महाराष्ट्र सरकारचे धोरण आहे असल्याचे विदर्भवाद्यानी जाहीर केले.
विदर्भ राज्यामध्ये बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, बेकारी, गुंडगिरी हे मोठ्या प्रमाणावर वाढत असून याचे मुख्य कारण म्हणजे शासनाकडून नोकर भरती होत नाही. आणि विदर्भातील युवकांनावर सतत अन्याय करत विदर्भातील युवकांना २३% नोकरभरतीत सामावून घेतले जातं नाही, कधी भरती घेतली तरी घोटाळेच घोटाळे करून विदर्भावर अन्याय करत असल्याचे करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. मानवाच्या मुख्य गरजा अन्न, वस्त्र, निवारा आहे, मग हेच मुख्य वस्तू महाग करून आपले पोट शासन आणि सरकार उघड पणे भरत आहे.
तरी आपण विदर्भवासी गप्प का बसलो आहे हेच कळत नाही, आपण आपल्या अन्यायाच्या विरोधामध्ये बंड पुकारणार नाही तोपर्यंत आपला वाली कोणी राहणार नाही, कारण महागाईच्या काळामध्ये मरावं की जगावं हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, कारण पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल,कडधान्य, वस्त्र, शेतीविषयक वस्तू आणि आरोग्यविषयक औषध हे मोठ्या प्रमाणावर महाग झाले आहे म्हणून या महागाईच्या काळामध्ये उद्योगपती ते मोठे होत आहे, आणि गरीब ते गरीबच होत आहे, कारण भारत सरकार किंवा राज्यसरकार उद्योगपतीचे कर्ज माफ करू शकते पण आम्हा गरीब शेतकऱ्यांचे नाही करत, कारण गरीबापासून सरकारचा काहीच फायदा नाही ,गरीब फक्त मतदाना साठी कामी येतो आणि तेंव्हाच आठवतो, त्यांना माहीत आहे त्यांनी जाणून बुजून गरिबांची थट्टा करीत आहेतं जोपर्यंत विदर्भाचा स्वतंत्र विदर्भ राज्य होत नाही तोपर्यंत विदर्भातील जनतेला न्याय मिळणार नाही.
स्वतंत्र विदर्भ राज्य झाले तर संपूर्ण विदर्भाच्या जनतेला १००% रोजगार मिळेल व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे जमीन पट्टे मिळेल आणि विदर्भ राज्यामध्ये नवनवीन उद्योग निर्मिती होईल आणि वेगवेगळे नवीन विभागाची निर्मिती होईल, त्यामध्ये वनविभाग, जलसंपदा विभाग,पोलीस विभाग, महसूल विभाग,आरोग्य विभाग, विद्युत विभाग,कृषी विभाग आणि मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषद,पंचायत समिती, ग्रामपंचायत यासारख्या असंख्य नवीन विभागाची निर्मिती होणार,आणि नगरसेवक, सभापती,सरपंच, आमदार, खासदार,मंत्री यासारख्या मोठ्या पदावर विराजमान आपल्या विदर्भातीलच सुपुत्रांना संधी मिळणार आहे, अबकी बार विदर्भ की सरकार या म्हणीचा आपण स्वागत केलं पाहिजे, आणि प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सर्व विदर्भातील तमाम जनता एकत्र येऊन जनआंदोलन करून आपल्या हक्काचे विदर्भ राज्य मिळवून घेण्यासाठी युवक, युवती, शेतकरी पेटून उठले पाहिजे, यासाठी आपण सर्व क्रांतिकारी विदर्भ राज्य आंदोलन समिती मध्ये सहभाग घेऊन आपले हक्क मागण्यांसाठी, मिशन २०२३ पूर्ण करू,आणि १ मे ला काळा दिवस साजरा करू असे आवाहन विदर्भवाद्यानी यावेळी केले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...