आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
**
( सय्यद शब्बीर जागीरदार )
जिवती:-देश स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव साजरा करत असतो आणि दुसरीकडे अतिदुर्गम जिवती तालुका व तालुक्यातील काही गाव हे मूलभूत सुविधापासून आता पण वंचीत आहेत अशातील एक गाव म्हणजे "गोंदापूर"जिवती तालुक्यातील पूर्वकडील टोकावर वसलेले तेलंगना राज्याच्या सीमेवरील हे एक छोटेसे बोलका गाव"गोंदापूर"मूलभूत सोयीसुविधापासून वंचित गावाला जायला रस्ता नाही,पिण्याच्या पाण्याची सोय नाही, गावात आंगणवाडी केंद्र नाही शाळा,नाही समजताच समाजसेवने झपाटलेल्या एका सुशिक्षित तरुणांने गावाला भेट देत गावला सुधारण्याचे जणू व्रत घेतले आणि गावाला मूलभूत सोयी-सुविधा मिळवून देण्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले. याची सुरवात या तरुणांनी एक तें दोन वर्षापूर्व केली. हा तरुण नेमका कोण तर गावखेड्याती "आनंदगुडा "येथील हा तरुण चंद्रपूर येथे स्पर्धा परीक्षा तयारी करायचा कोरोना काळात गेल्या दोन वर्षापासून हा तरुण गावाकडे राहिलेला हा मागच्या दोन वर्षापासून हा तरुण नेहरू युवा केंद्र व क्रीडा मंत्रालय भारत सरकार च्या संस्थे मध्ये येथे जिवती तालुका स्वयंसेवक समन्व्यक म्हूणन काम करायचा कोरोना काळामध्ये या तरुणांनां कडे संस्थे मार्फत अनेक कामे वाढविण्यात आली.या तरुणांने अनेक युवकांचे संघटन तयार करत आपणच आपल्या गावचे सैनिक, आपणच आपल्या गावचे रक्षक या मध्येमातून गावोगावी तरुणांचे मंडळ तयार करत कोरोना काळात गावरक्षणांचे धडे दिले गावोगावी युवकांच्या माध्येमातून जनजागृत्या करत पथनाटे करत आणि आणि लोकांना कोरोना नेमका कसा वाढतो आणि त्यावर उपाययोजना काय, असे गावोगावी तरुणांच्या ,आशासंयसेविका अंगणवाडीताई यांच्या मदतीने लोकांमध्ये मास्क वाटप करण्यापासून तें अनेक मध्येमातून वेगवेगळ्या जनजागृत्या केल्या खेडोपाड्यात लोकांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहचवत अशातच या युवकाला "गोंदापूर "या गावाबद्दल माहिती मिळाली आणि गेल्या दोन तें ते दीड वर्षापासून या युवकांने वेगवेगळ्या वर्तमान पत्राच्या मध्येमातून व जय महाराष्ट्र टीव्ही ला गोंदापूर गाव च्या समस्या चे चित्र प्रकाशित केले.संपूर्ण महारष्ट्राला गोंदापूर दाखविण्यात प्रयत्न केला आणि त्याचा पर्यन्त शेवटी यशस्वी ही झाला. गावाकऱ्याच्या मदतीने सतत या बाबीचा पाठपुरावा करत गोंदापूर या गावाची परिस्थिती शासनाच्या लक्षात आणून देण्याचे व्रतच जणू या तरुणांने घेतले.आणि शेवटी शासनाला जाग आणून दिली याचीच दखल घेत दिनांक 18 ऑक्टोबर 2021 रोजी जि. पं. सि. ई.ओ.डॉ. मिताली शेठी यांनी गावाला आपत्कालीन भेट देत गावातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी गावकऱ्यांनी जीवन जगत असताना कोणकोणत्या समस्याचा सामना करावा लागतो यांचे भयावह चित्र गावकऱ्यांनी मांडले. याचीच दखल घेत अतिमहत्वाचे नाजूक विषय हाती घेऊन गावाला फिल्टरयुक्त पिण्याचे सुद्ध पाणी व जाण्यायेण्यासाठी खडीकरणं रस्ता देण्याचे आश्वासनं दिले यातील फिल्टर चे काम गावात सद्या युद्ध पातळीवर चालू असून लवकरच गावाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार असल्याने गावकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिताली शेठी यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे.
परंतु आमच्या गावाला येण्याजाण्यासाठी रस्ता मिळणार का नाही असा प्रश्न ही गावकऱ्यांनी उपस्थित केला.पावसाळा अगदी एक तें दीड महिन्यावर येऊन टेकला असून रस्त्याच्या कामाला सुरवात कधी होणार? गेल्या पाच ते सहा महिन्यापासून आमचे डोळे आश्वासनावर आतुरल्याचे गावकऱ्यांनी आशा व्यक्त केली.
गावाला रस्ता हा खूप महत्वाचा असून रस्त्याआभावी गावात रुग्णवाहीका सुद्धा येत नसल्याने गावकऱ्यांना आपल्या महिलांची प्रसुती ही गावातच करावी लागते,यावेतरिक्त गावातील एकादा व्यक्तीची परिस्थिती ही खूप नाजूक असेल तरी त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत.यामुळे गावाला रस्ता होणे खूप आवश्यक वाटतें सामाजिक कार्यकर्ते गोविंद गोरे यांच्यासह गावकऱ्यांनी केली आशा व्यक्त.
(रस्त्याआभावी गावात 108,102, रुग्णवाहीका सुद्धा येऊ शकत नसल्याने गावातील महिलांची प्रसुती ही गावातच करावी लागते.यावेतीरिक्त गावातील एकाद्या व्यक्तीची नाजूक परिस्थिती असेल तर वेळेवर उपचार मिळत नाहीत यामुळे रस्ता होणे आवश्यक वाटतें "सामाजिक कार्यकर्ते गोविंद गोरे"
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...