वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस: घुग्घुस येथील प्रयास सभागृहात आयएमए चंद्रपूर व सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रतर्फे अस्थायी कामगारांच्या आरोग्य तपासणीचे शिबीर संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन, चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. अमोल पोद्दार, सचिव डॉ. नगीना नायडू, कोषाध्यक्ष डॉ. अमित देवईकर, डॉ. पुनम नगराळे, डॉ. करुणा रामटेके, डॉ. राकेश संगत, रियांशु तावाडे, सत्यजित पोद्दार, प्रशांत रामटेके भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सभापती नितुताई चौधरी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी उपसरपंच संजय तिवारी, जेष्ठ नागरिक प्रेमलाल पारधी, गजानन जांभुलकर, भारत गाताडे, वसंता गोनेवार, अरविंद गाताडे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. उन्हात काम करतांना कामगारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. प्रदूषणामुळे कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होतो, कामगारांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्वाकांक्षी योजना कामगारांसाठी काढल्या आहेत. प्रत्येक कामगारांनी ई-श्रम कार्ड काढावे तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना काढावी.
डॉ. अमल पोद्दार यांनी उपस्थित कामगारांना काम करत असतांना आरोग्य विषयक घ्यावयाच्या काळजीबद्दल सविस्तर माहिती दिली.
डॉ. नागिना नायडू यांनी संबोधन करतांना कामगारांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी, बिमारी अंगावर काढू नये तसेच गरज भासल्यास सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही दिली.
मोठया संख्येत उपस्थित कामगारांच्या आरोग्याची तपासणी डॉक्टरांमार्फत करण्यात आली व मोफत औषधं वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपाचे स्वप्नील इंगोले, शरद गेडाम, सिनू इसारप, श्रीकांत सावे, दिलीप कांबळे, असगर खान व मोठया संख्येत कामगार उपस्थित होते.
संचालन वाहतूक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद चौधरी यांनी तर आभार अजगर खान यांनी मानले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...