सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपूरी: ब्रम्हपूरी शहरातील देलनावाडी येथील मदरपेठ स्कुलच्या मागील रोडवर नेहमीप्रमाणे कॅश जमा करून घेउन जाणाऱ्या इसमाला मीरची पावडर टाकून व मारहाण करून लूटणाच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपींना ब्रम्हपूरी पोलीसांनी 12 तासाच्या आत पकडून त्यांच्या मुसक्या आवळल्या.
तक्रारदार संजय देवाजी कुलसंगे रा . ब्रम्हपूरी यांचा कॅश गोळा करून बँकेत जमा करण्याचे काम असून नेहमीप्रमाणे अॅमेझॉन सेंटर येथून दि . 25/04/2022 चे सकाळी 10.00 वा . दरम्यान 1,63,000 रू . गोळा करून आपले मोटारसायकलने जात असतांना मदरपेठ स्कुलच्या मागील रोडवर त्यांना 2 इसमांनी अडवून त्यांच्या डोळयात मीरची पावडर टाकून व हाताला मारहाण करून त्यांचेकडील कॅश असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.
परंतू त्यांनी प्रतिकार करून आरडाओरड करताच बाजूला काम करीत असलेले मजूर धावत येताच मागे मोटारसायकल घेउन उभा असलेला आरोपी याने दोघांना घेउन तिथून पळ काढला . संजय देवाजी कुलसंगे यांचे रीपोर्ट पोस्टेला कलम 394 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर घटनेची माहीती मिळताच पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचा स्टॉफ त्वरीत घटनास्थळी येउन त्यांनी आरोपींच्या शोधकामी शहरात चहूबाजूने हालचालीस सुरूवात केली.
गोपनीय व तांत्रिक मदत घेउन त्यातील एक आरोपी अजय अंबादास निहाटे रा . नवेगाव याचा शोध घेतला असता तो मालडोंगरी फाट्याजवळ मिळून आला. त्याचेकडून दुसरा आरोपी शिवशांत उर्फ भिस्सू दामोधर भूरे , रा हनूमान नगर , ब्रम्हपूरी याचे नाव कळल्यावर त्याचेही शोधकामी पथक रवाना असून तो रात्री हनूमान नगर भागात लपतांनी सापडला . तसेच त्यांच्यात एक विधीसंघर्षग्रस्त बालक असून त्यासही ताब्यात घेण्यात आले.
सर्व आरोपी अटक असून त्यांना जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच गुन्हयात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. सदरची कामगिरी मा . मिलींद शिंदे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग ब्रम्हपूरी , पोलीस निरीक्षक रोशन यादव यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे, सपोउनी / संजय गौरकार, पोहवा / नरेश रामटेके , नापो / योगेश शिवनकर, नापो / मुकेश गजबे, पोशी / संदेश देवगडे यांनी केली, नागरीकांना आवाहन करण्यात येते कि, आपण घराबाहेर पडतांनी जास्त रोख रक्कम जवळ न बाळगता ऑनलाईन व्यवहार करण्यास प्राधान्य दयावे. तसेच घरात सुध्दा जास्त रोख रक्कम व मौल्यवान दागिने न ठेवता सुरक्षित ठेवावे .
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...