रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (प्रतिनिधी): तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा गावातील पुलाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अजूनही प्रलंबित आहे. अमलनाला धरणाचा स्त्रोत असलेल्या या नाल्यावर पुलाची व बंधाऱ्याची अत्यंत गरज आहे. शेतकऱ्यांना व कामगारांना पावसाळ्यात पुरामुळे ताटकळत राहावे लागते. अद्यापही पुलाच्या बांधकामास सुरुवात झालेली नसल्याने नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक वर्षापासून नागरीक त्रास सहन करत असून लोकप्रतिनिधींकडून नागरिकांना केवळ आश्वासनच मिळत आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतीचे साहित्य पलीकडे नेता येत नसल्याने शेतातील काम खोळंबून राहतात. त्याचबरोबर यापूर्वी अनेक नागरिकांच्या व जनावरांचे पुरामुळे अपघातही झालेले आहे. पुलाचे काम होइल अशी आशा शेतकर्यांना होती. अद्यापही कामं चालू न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. या भागात बंधाऱ्याची गरज असून सिंचनाचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
नांदा येथील हा नाला बारमाही असून जवळपास दोनशेहून अधिक हेक्टर शेती सिंचनाखाली बंधाऱ्यामुळे येईल आणि याचा मोठा लाभ शेतकऱ्यांना उत्पादनात होऊ शकतो. जवळपास ७० मीटरचा हा पूल झाल्यास परिसरातील नांदा, आवाळपुर, राजुरगुडा, नोकारी, पालगाव आदी गावातील शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यास सोयस्कर होईल. सदर मार्ग हा गडचांदूर आदीलाबाद अंतर मार्गाला जोडणारा असल्याने नागरिकांचा वेळ व खर्चही वाचेल. यासंदर्भात नुकतेच अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव तथा नांदा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रत्नाकर चटप यांनी मुंबई येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन सदर नागरिकांच्या हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करून लेखी निवेदन दिले. ग्रामविकास मंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...