वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूर द्वारा संचलित, चिंतामणी महाविद्यालय घुगुस, जि. चंद्रपूर येथे दिनांक 26 एप्रिल 2022 रोज मंगळवारला द. 9.00 वाजता "वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे" आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आमचे मार्गदर्शक डॉ चंद्रशेखर कुंभारे हे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रवी धारपवार ( अध्यक्ष, लोकप्रशासन अभ्यास मंडळ, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली ) हे होते. तर प्रमुख पाहुणे प्रा. संतोष गोहोकार (इतिहास विभाग प्रमुख) हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास डॉ. माधव कांडण गीरे (मराठी विभागप्रमुख) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. महेंद्र कुंभारे हे कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. महेंद्र कुंभारे यांनी केली. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांस्कृतिक कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये असलेले सुप्त गुणांचे सादरीकरण करण्यासाठी सांस्कृतिक विभाग हे वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ तयार करून देण्याचे माध्यम असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ चंद्रशेखर कुंभारे यांनी विद्यार्थ्यांना संस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना एक नवीन ऊर्जा देण्याचे कार्य करीत असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रवि धारपवार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा देऊन आणि भावी आयुष्यामध्ये आपली उत्तरोत्तर प्रगती या स्नेहसंमेलन कार्यक्रमा च्या माध्यमातून करावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. माधव कांदनगिरे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात. तसेच प्रा. संतोष गोहोकर यांनी आपल्या मनोगतातून संस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमा त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ग्रुप डान्स, सोलो डान्स, नक्कल, नाटिका इत्यादी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निवेदीता लोखंडे यांनी केले. तर आभार कु. धनश्री पिदुरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्रा मंगेश जमदाडे, प्रा. गणेश सुर्जुसे तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रमास सहकार्य केले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...