वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): दि. २४ एप्रिल रोजी सायंकाळी नकोडा येथील फुले-शाहू-आंबेडकर रंगमंच नकोडा येथे विजयक्रांती कामगार संघटना मार्फत भव्य कामगार मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित कामगार मेळावा मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. विजयभाऊ वडेट्टीवार तसेच महाराष्ट्र प्रदेश महासचिव युवक कॉंग्रेस तथा अध्यक्षा, विजयक्रांती कामगार संघटना कु. शिवानी ताई वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयोजित भव्य कामगार मेळावा प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या आगमनाकरिता पांढरकवडा-घुग्घुस-एसीसी मार्गे कामगाराची भव्य रैली सह मान्यवराचे स्वागत करण्यात आले. विजयक्रांती कामगार संघटना फलकाचे अनावरण मा.विजयभाऊ वडेट्टीवार व कु. शिवानीताई वडेट्टीवार यांचा हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी विजय क्रांती कामगार संघटनाच्या अध्यक्षांनी कामगारबांधवांना विजय क्रांती कामगार संघटना हि सर्वस्वी कामगाराच्या हितार्थ आहे.
हि संघटना प्रत्येक कामगाराच्या सामाजिक उत्कर्षासाठी, नैतिक मुल्य जपण्यासाठी तसेच हित संबंध संरक्षण व संवर्धणासाठी कार्य करते. तसेच हि एकमेव संघटना आहे, जी कामगारचा कल्याणार्थ सातत्याने कार्यरत आहे. असे प्रतिपादन शिवानीताई वडेट्टीवार यांनी उपस्थितांना केले.
कामगार बांधव हा औद्योगिक क्षेत्राचा कणा आहे. औद्योगाची भूमिका हि नेहमी कामगार केंद्रित असायला पाहिजे. तशी भूमिका ठेवणारा कुठलाही उद्योग अपेक्षित भरभराटी साधल्या शिवाय राहणार नाही. कामगार वर्गाला न्याय व त्यांच्या रास्त मागण्यासाठी मी देखील तुमच्या खांद्याला खांदा लाऊन तुमच्या सोबत असेल. असे प्रतिपादन पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी उपस्थिताना केले.
कामगारांना त्यांचे हक्क व अधिकार न्यायिक स्वरुपात तसेच कार्यस्थळी सुव्यवस्था व सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने यामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कामगारामुळेच आज देश औद्योगिक व इतर क्षेत्रात अपेक्षित प्रगती करू शकला आहे.
आयोजित मेळाव्या प्रसंगी माजी नगराध्यक्ष गडचिरोली मा. अड. राम मेश्राम , कामगार नेते विजयक्रांती कामगार संघटना विजय ठाकरे, कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी शहर कॉंग्रेसअध्यक्ष नंदू नागरकर यांची उपस्थिती होती. विजयक्रांती कामगार संघटनेचे कार्यध्यक्ष श्री. प्रवीणभाऊ लांडगे यांचा संकल्पना तथा मार्गदर्शना खाली भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
विजयक्रांती कामगार संघटना एसीसी चांदा सिमेंट वर्कस् संघटनेचे महासचिव सतीश शेंडे, उपाध्यक्ष राज बावणे तसेच स्थायी संघटनेचे राजेश यंगलवार व उपाध्यक्ष नितीन पटेल, शिंदोला गोवारी माईन्स,चे उपाध्यक्ष सतिश जोगी व कंत्राटी संघटनेचे उपाध्यक्ष दत्तू ठाकरे, अल्ट्राटेक सिमेंट,चे महासचिव सुनील ढवस व उपाध्यक्ष दशरथ राऊत, अंबुजा सिमेंट चे महासचिव बबन अत्राम व कार्याध्यक्ष सुधीर विधाते, पैनगंगा ओपन कास्ट,चे महासाचिव रोशन हरबडे व उपध्यक्ष जावेद खान,माणिकगड, दालमिया कंपनीचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...