Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *पत्रकारांनी आपल्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*पत्रकारांनी आपल्या समस्या PSVPSS संघटनेकडे मांडाव्यात* *प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांचे किनवट बैठकीत आवाहन*

*पत्रकारांनी आपल्या समस्या PSVPSS संघटनेकडे मांडाव्यात*  *प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांचे किनवट बैठकीत आवाहन*

 

किनवट,नांदेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांच्या उपस्थितीत किनवट तालुका कार्यकारणीची महत्त्वपुर्ण  बैठक दिनांक २४ एप्रिल,२०२२ रोजी "आज की न्यूज" कार्यालयात पार पडली. सदर बैठकीत किनवट तालुका कार्यकारणीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली. पत्रकारांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा यशस्वीपणे प्रयत्न संघटनेमार्फत होत असून आपल्या काही समस्या असतील तर त्या जिल्हा कार्यकारिणीकडे किंवा संस्थापक अध्यक्ष श्री डी. टी. आंबेगावे सर यांच्याकडे मांडाव्यात त्यावर ठोस निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन जिल्हाध्यक्ष श्री संजीवकुमार गायकवाड यांनी किनवट येथील बैठकीत दिले.
 तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, किनवट टीमच्या वतीने विविध विधायक कार्यक्रम राबवून समाजसेवा कार्यात अग्रेसर असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून पुढील कार्यास सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड यांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, किनवटच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
याप्रसंगी किनवट तालुका अध्यक्ष आशिष शेळके, तालुका सचिव नसिर तगाले, कार्याध्यक्ष सय्यद नदीम, तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील, तालुका उपाध्यक्ष शेख अतिफ, सहसचिव प्रणय कोवे, तालुका सहकोषाध्यक्ष मारोती देवकाते, तालुका कार्यकारिणी सदस्य रमेश परचाके, चंद्रकांत कागणे, प्रा.जोगदंड, उद्धवराव रामतीर्थकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...