Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईनच्या सतर्कतेने जिल्ह्यातील दोन बालविवाह रोखण्यात यश

बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईनच्या सतर्कतेने जिल्ह्यातील दोन बालविवाह रोखण्यात यश

चंद्रपूर दि. 20 एप्रिल : मुल व वरोरा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर मिळाली. त्याअनुषंगाने सदर बालविवाहाची माहिती चाईल्ड लाईन टीमने जिल्हा बाल संरक्षण कक्षास दिली. जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईन, चंद्रपूर यांच्या सतर्कतेने सदर बालविवाह थांबविण्यात आला.
चाईल्ड लाईन, चंद्रपूरच्या संचालिका नंदा अल्लूरवार, सरचिटणीस प्रभावती मुठाळ यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर चाईल्ड लाईनने संबंधित गावातील ग्रामपंचायत, शाळा आणि अंगणवाडी केंद्र येथून अल्पवयीन बालिकेचा वयाचा पुरावा प्राप्त केला. या पुराव्याच्या आधारावर दोन्ही प्रकरणात मुल व वरोरा येथील पोलिस विभागाच्या सहकार्याने सदर टीमने स्वतः उपस्थित राहून कार्यवाही पार पाडली. अल्पवयीन बालिकेचे व तिच्या पालकांचे समुपदेशन करून मुलीला व मुलीच्या पालकांना बालकल्याण समिती, चंद्रपूर समोर उपस्थित करण्यात आले.
सदर केसमध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, चाईल्ड लाईन,चंद्रपुर टीमच्या सदस्या चित्रा चौबे, कल्पना फुलझेले, प्रदीप वैरागडे, प्रणाली इंदुरकर, नक्षत्रा मुठाळ, समूपदेशिका दिपाली मसराम, चाईल्ड लाईन चंद्रपूरचे समन्वयक अभिषेक मोहुर्ले, पोलीस विभाग आदींचे सहकार्य लाभले. 
जिल्ह्यात होत असलेले बालविवाहासंदर्भात माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णतः गोपनिय ठेवण्यात येते. बालविवाह संदर्भात माहिती तसेच काळजी व संरक्षणाची गरज असणारे 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना मदत करण्याकरिता चाईल्ड लाईनच्या 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन चाईल्ड लाईन, चंद्रपूर मार्फत करण्यात आले आहे.
०००००००

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...